26.8 C
Ratnagiri
Saturday, December 9, 2023

गंजलेल्या खांबावर विद्युत वाहिन्या , मोडकाआगारमधील स्थिती

मोडकाआगर येथील नारळ, सुपारी व काजूच्या बागेतील...

पक्षाच्या कोकणातील नेत्यांना संपवण्याचा विडा – रामदास कदम

कोकणातील पक्षाच्या नेत्यांना संपवण्याचा विडा उद्धव ठाकरे...

श्रमदानातून बंधारे उभारल्याने एक कोटीची बचत – पाणी जिरवा मोहीम

पाण्याची बचत व साठवण केल्यास त्याचे उन्हाळ्यात...
HomeRatnagiri१६ मे आणि १७ मे रोजी संगीतकार अशोक पत्की यांच्याशी संगीतमय गप्पा

१६ मे आणि १७ मे रोजी संगीतकार अशोक पत्की यांच्याशी संगीतमय गप्पा

रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी अनेक मालिकांची शीर्षकगीते संगीतबद्ध केलेल्या संगीतसम्राट अशोकजी पत्कीना प्रत्यक्ष  अनुभवण्याची, जाणून घेण्याची संधी देवरूख आणि रत्नागिरीवासीयांना मिळणार आहे.

रत्नागिरी व देवरूखमध्ये ख्यातकीर्त संगीतकार अशोक पत्की यांच्याशी संगीतमय गप्पांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. चतुरंगच्या मुक्तसंध्या या उपक्रमातून अनेक कलाकारांशी, मान्यवर नामवंतांशी आमने सामने सहवास आणि संवाद साधण्याची संधी रसिकांना बरेच वेळा मिळत असते. येत्या १६ मे आणि १७ मे रोजी या दोन दिवशी कार्यक्रम होणार असून, जास्तीत जास्त रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन चतुरंग प्रतिष्ठानने केले आहे.

सुमारे ५० वर्षांच्या कारकीर्दीत शेकडो चित्रपट-नाटकांना अजरामर संगीत दिलेल्या, शेकडो जिंगल्स लोकप्रिय केलेल्या आणि रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी अनेक मालिकांची शीर्षकगीते संगीतबद्ध केलेल्या संगीतसम्राट अशोकजी पत्कीना प्रत्यक्ष  अनुभवण्याची, जाणून घेण्याची संधी देवरूख आणि रत्नागिरीवासीयांना मिळणार आहे. इतका काळ लोटला तरी देखील आपल्या संगीताने जनतेला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य अजूनही त्यांच्या कलेमध्ये टिकून आहे. देवरूख येथील अभिरुची या संस्थेच्या सहकार्याने १६ मे रोजी सायं. ६.३० वा. लक्ष्मीमंगल कार्यालयात कार्यक्रम संपन्न होणार आहे. तसेच रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी वाचनालयाच्या सभागृहात १७ मे रोजी सायं. ६ वा. हा कार्यक्रम रंगणार आहे.

पत्कींच्या संगीत साधनेतील वेगळेपणाची ओळख सांगणारा, अनेक प्रकारच्या चांगल्या वाईट अनुभवांनी सजलेला आणि स्वर रचनांमागील वैशिट्य आणि  वेगळेपणाचा त्यांचा प्रवास आपल्याला या सांगीतिक गप्पांमधून अनुभवता, जाणून घेता येणार आहे. त्यांच्याशी सुसंवाद साधत त्यांना बोलतं करणार आहेत. देवरूख, रत्नागिरी आणि परिसरातील रसिकांनी संगीतप्रेमी रसिक मित्रमंडळींसह उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन चतुरंग प्रतिष्ठान परिवार, अभिरुची संस्था आणि रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयामार्फत करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular