रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हातचलाखी करून छोट्या मोठ्या चोऱ्या करणाऱ्या भुरट्या चोरांच प्रकरणे पुढे येत आहेत. जिल्ह्यामध्ये सध्या विविध कारणास्तव अनेकांची शासकीय कार्यालयांसमोर आंदोलने सुरु आहेत. त्यामुळे, अशा भुरट्या चोरांना सुद्धा चांगलीच संधी चालून आली आहे.
काही आठवड्यांपूर्वी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटबाहेर मंडणगड येथील नागरिक उपोषणासाठी बसले होते. या उपोषणकर्त्याचा मोबाईल चोरीला गेला आहे. याबाबत विजय सीताराम काते रा.परकार कॉम्प्लेक्स, मंडणगड यांनी शहर पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीची तक्रार नोंदवली होती. उपोषणाच्या ठिकाणाहून मोबाईलची चोरी केली जाते याबाबत पोलिसांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केले.
पोलिसांनी तक्रार दाखल होताच तत्काळ आपली सूत्रे फिरविल्यामुळे, आरोपी नॉट रिचेबल होण्याच्या आधीच त्याच्या मुद्देमालासह मुसक्या आवळण्यात आल्या. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली आहे. सोमवारी न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुबीन अश्ररफ शेख असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विजय काते हे उपोषणाला बसले होते. या ठिकाणाहून काते यांचा मोबाईल चोरीला गेला होता.
रविवारी सायंकाळी मुबीनला रत्नागिरी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. आणि मोबाईलची चौकशी केली असता, सुरुवातील मान्य न करता पोलिसी खाक्या दाखवल्यावर चोरी केल्याचे मान्य केले. या प्रकरणाचा चा अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल दिनेश हरचकर करत आहेत. अशा भुरट्या चोऱ्या करणाऱ्यांची हिस्ट्री पोलिसांना माहित असल्याने वेळीच तपास सुरु करून अशा आरोपींना पकडण्यात रत्नागिरी शहर पोलिसांना यश मिळाले आहे.