22.6 C
Ratnagiri
Monday, December 8, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriप्रसिध्द मिरकरवाडा बंदरासह १६ लैंडिंग पॉईंटवर होणार मॉक ड्रिल

प्रसिध्द मिरकरवाडा बंदरासह १६ लैंडिंग पॉईंटवर होणार मॉक ड्रिल

कोकण किनारपट्टीवर देखील मॉक ड्रिल करण्यात येणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खोल समुद्रात मॉक ड्रिल होणार आहे. प्रामुख्याने मिरकरवाडा बंदर आणि अल्ट्राटेक जेटीसह एकूण १६ लैंडिग पॉईंटवर मॉक ड्रिल होणार आहे. तटरक्षक दलाच्यावतीने हे मॉक ड्रिल होणार असून त्यांचे पथक मंगळवारीच समुद्रात दाखल झाले आहे. देशाच्या सागरी सुरक्षेच्यादृष्टीने कोकण किनारपट्टीवर देखील मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. सागरी सुरक्षेच्यादृष्टीने रत्नागिरी हा जिल्हा देखील महत्त्वाचा मानला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या समुद्रात सागरी सुरक्षेच्या दृष्टीने कोस्ट गार्डच्या यंत्रणेकडून समुद्रात गस्त घातली जात आहे. या गस्ती दरम्यान कोस्ट गार्डच्या यंत्रणेकडून समुद्रातील आणि समुद्र किनाऱ्यावरील बोटींची तपासणी केली जात आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण १६ लैंडिंग पॉईंट्स आहेत. १६ लैंडिंग पॉईंट्ससह मिरकरवाडा बंदर आणि अल्ट्राटेक जेट्टी या ठिकाणीही मॉक ड्रिल केले जाणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular