26.6 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriजिल्ह्यात आज पाच ठिकाणी 'मॉक ड्रील' - सर्व यंत्रणा सज्ज

जिल्ह्यात आज पाच ठिकाणी ‘मॉक ड्रील’ – सर्व यंत्रणा सज्ज

पहलगाम दहशतवाही हल्ल्यानंतर भारत - पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीमचे नियोजन आणि पूर्वतयारी यावेळी करण्यात आली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, सहायक उपनियंत्रक धमेंद्र जाधव, संबंधित विभागाचे अधिकारी आणि नागरी संरक्षण दलाचे जिल्हा उपनियंत्रक लेफ्टनंट कर्नल प्रशांत चतुर हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. केंद्रीय गृह मंत्रालयाने नागरी संरक्षण संवर्धन सज्जता मजबूत करण्यासाठी ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीमचे (मॉक ड्रील) आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील रत्नागिरी तहसिलदार कार्यालय, रत्नागिरी रेल्वेस्थानक, राजापूर नगरपालिका, दापोली आणि संगमेश्वर तालुक्यातील एक ग्रामपंचायत येथे उद्या सायंकाळी ४ वाजता मॉक ड्रील करण्यात येणार आहे.

यावेळी आरोग्य यंत्रणा, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, प्रथोमोपचार याबाबी सज्ज असणे आवश्यक आहे. त्यामध्ये आपदा मित्र आणि नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक सहभागी होतील. मॉक ड्रीलसाठी तालुकास्तरावरील सर्व यंत्रणांनी नियंत्रण कक्ष कार्यान्वित ठेवावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. उद्या मत्स्यविभाग, बंदरे, मेरीटाईम बोर्ड, फिनोलेक्स, जेएसडब्ल्यू, अल्ट्राटेक आदी कंपन्या, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत औद्योगिक वसाहतीमधील महाविद्यालयांनी मॉक ड्रील करून अहवाल प्रशासनाकडे सादर करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी दिल्या. या बैठकीच्या सुरुवातीला निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी मॉक ड्रीलच्या अनुषंगाने संगणकीय सादरीकरण केले.

सज्जता तपासणार – दरम्यान, पहलगाम दहशतवाही हल्ल्यानंतर भारत – पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना ७ मे रोजी मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन किती सज्ज आहे, याची चाचणी घेण्यासाठी हे मॉक ड्रील घेतले जाणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular