31.3 C
Ratnagiri
Friday, May 24, 2024

दापोलीतील महिलेच्या मृत्यूचे गूढ वाढले, नातेवाईकांना घातपाताचा दाट संशय

तालुक्यातील वणंद येथील ५० वर्षीय महिलेच्या मृत्यूचे...

महावितरणला ५७२ कोटीचा प्रकल्प मंजूर

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण योजनेतून...

४ दिवस रत्नागिरीत पावसाचा इशारा

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी...
HomeRajapurमोदी-राणे हे कोकण विकासाचे परफेक्ट कॉम्बिनेशन : देवेंद्र फडणवीस

मोदी-राणे हे कोकण विकासाचे परफेक्ट कॉम्बिनेशन : देवेंद्र फडणवीस

कोकणचा विकास साधण्यासाठी राणे यांच्या माध्यमातून महायुतीला साऱ्यांनी साथ द्या.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नारायण राणे निश्चितच कोकणचा विकास साधतील. नारायण राणेंना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत. त्यामुळे नारायण राणेंना मोठ्या मताधिक्याने निवडून देत मोदींना साथ द्या. आताची लोकसभेची निवडणूक ही भारताचे सक्षम नेतृत्व निवडण्याची आहे. त्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुती निवडणूक रिंगणात आहे. तर, विरोधी गटात राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली विविध पक्षांची खिचडी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

शहरातील राजीव गांधी क्रीडांगणावर झालेल्या प्रचार सभेत फडणवीस म्हणाले, “नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘निश्चितच अबकी बार चारसो पार’ होणार आहेत. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून खासदार म्हणून कोकणचे प्रतिनिधित्व असणे गरजेचे आहे. त्यामुळे कोकणचा विकास साधण्यासाठी राणे यांच्या माध्यमातून महायुतीला साऱ्यांनी साथ द्या. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली इंजिनाला विविध पक्षांचे डबे जोडलेले आहे. त्या डब्यांमध्ये समाजातील सर्वस्तरातील लोक बसलेले असून सबका साथ सबका विकास करीत ही गाडी पुढे जात आहे. या गाडीमध्ये सर्वसामान्यांना बसण्यासाठी जागा आहे.

मात्र, पलीकडील गाडीला डबे नसून सर्वच इंजिन, सर्वसामान्यांना बसण्यासाठी जागा नाही.” फडणवीस म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थव्यवस्था बळकट होत भारताचा सर्वांगीण विकास झाला आहे. त्याद्वारे भारताने जगामध्ये मानसन्मान प्राप्त करीत जगामध्ये महासत्ता होण्याच्यादृष्टीने सक्षमपणे वाटचाल करीत आहे. सर्वसामान्य, शेतकरी, महिला, उद्योजक यांसह समाजातील विविध घटकांचा विविध योजनांच्या माध्यमातून विकास साधला गेला आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे.”

राहुल गांधींचे जाहीरनामे – शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जाहीरनामा प्रसिद्ध केला. मात्र, इंडिया आघाडीतील हे सर्व जाहीरनामे म्हणजे राहुल गांधीचे जाहीरनामे आहेत. त्यामुळे यांनी आपले स्वतंत्र जाहीरनामे प्रसिद्ध करून काय उपयोग, अशी टीकाही फडणवीस यांनी यावेळी केली.

RELATED ARTICLES

Most Popular