26.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeIndiaमोदींनी मला दिले 5.50 लाख रुपये - रंजीत दास

मोदींनी मला दिले 5.50 लाख रुपये – रंजीत दास

मला हा पहिला हप्ता मिळाला आहे म्हणून मी सदर चे पैसे परत करण्याचा कोणताही प्रश्न येत नाही

बिहार राज्यातील पाटणा शहरांमध्ये रणजीत दास या इसमाला बँकेच्या चुकीमुळे 5 लाख 50 हजार रुपये बँक खात्यामध्ये जमा झाले आणि नवनाट्याला सुरुवात झाली. रंजीत दास या इसमाच्या खात्यामध्ये 5 लाख 50 हजार रुपये जमा झाले, त्याला त्याची माहिती मिळताच त्याने ते पैसे खर्चही केले. थोड्या कालावधीनंतर बँकेला आपली चूक लक्षात आली व बँक अधिकारी कामाला लागले.

याबाबत बँकेने रंजीत दास यांना सदरची रक्कम बँक खात्यात जमा करावे याबाबत अनेक नोटिसा पाठवल्या परंतु रंजीत दास यांनी बँकेच्या नोटिसांना काहीही महत्त्व दिले नाही व पैसेही परत केले नाही. त्यानंतर बँक अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष मागणी नंतर रंजीत दास त्याने ठणकावून उत्तर दिले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येकाच्या बँक खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा करणार असून, त्यापैकी मला हा पहिला हप्ता मिळाला आहे म्हणून मी सदर चे पैसे परत करण्याचा कोणताही प्रश्न येत नाही”. संबंधित उत्तराने बॅंक अधिकार्‍यांनाही ही गांगरून टाकले आहे.

माननीय पंतप्रधान यांनी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करणार असल्याचे आश्वासन गेल्या निवडणुकीपूर्वी सामान्य जनतेला दिल्याने, सदरचा प्रकार घडून आला. पण त्याचा नाहक त्रास मात्र बँक अधिकारी सहन करत आहेत. आता त्यांच्यापुढे 5 लाख 50 हजार रुपये रंजीत दास कडून कसे वसूल करावे हा मोठा प्रश्न बँकेपुढे उभा राहिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular