26.7 C
Ratnagiri
Wednesday, February 18, 2026

देवरूख व संगमेश्वर बाजारपेठेत ओले काजूगर दाखल, दर चढाच

कोकणात आंबा व काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात...

मंडणगडमध्ये महामार्ग रुंदीकरणाचा पेच…

कोकणातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या मंडणगड शहरातून जाणाऱ्या...

चिपळुणात कुणाचा सभापती होणार? किंगमेकर शेखर निकमांच्या निर्णयाकडे लक्ष

चिपळुणात कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने पंचायत...
HomeRatnagiriमोहर, फळगळतीमुळे बागायतदार हवालदिल

मोहर, फळगळतीमुळे बागायतदार हवालदिल

आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे.

बदलत्या हवामानाच्या दुष्टचक्रातून अजून आंबा पीक सुटलेले नाही. नोव्हेंबरपर्यंत पाऊस लांबल्याने पालवीचे प्रमाण जास्त होते. थंडी सुरू झाल्यावर मोहर प्रक्रिया सुरू झाली, तर डिसेंबरमधील थंडीने फुलोरा चांगला आला होता. मात्र, थंडीचे प्रमाण वाढले अन् पुनमोहर सुरू झाल्याने मोहर झडून गेला, फळगळती बरोबरच फुलकिडीचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने आंबा पिकाचे भवितव्य टांगणीला लागले आहे. त्यामुळे बागायतदार चिंतेत असून यंदा आंबा बाजारात येण्यासाठी एप्रिलपर्यंत वाट पहावी लागणार आहे. जिल्ह्यातील आंबा कलमांना पहिल्या टप्प्यात ७० टक्के, तर दुसऱ्या टप्प्यात २० टक्के मोहोर आला. परंतु, हा सर्व मोहोर जास्त थंडी, ढगाळ वातावरण, प्रचंड धुके यामुळे अक्षरशः करपला आहे. त्यामुळे मोहोर चांगला आला असला तरी दहा टक्के देखील फळधारणा न झाल्यामुळे लाखो रुपये खते, कीटकनाशके, बुरशीनाशकांवर खर्च केलेले आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे.

आता बागायतदारांना तिसऱ्या टप्प्यातील मोहोरातून मिळणाऱ्या उत्पादनावर अवलंबून राहावे लागणार आहे. कोकणातील फळपिकांना गेल्या काही वर्षापासून मोठा फटका बसत आहे. आंबा पीक तर गेली काही वर्षे सतत बदलत्या वातावरणाच्या चक्रव्यूहात अडकल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात यावर्षी पाऊस लांबला, त्यामुळे आंबा हंगाम लांबणार, असा सुरुवातीचा अंदाज होता. परंतु १५ नोव्हेंबर नंतर थंडीची चाहुल सुरू झाली. नोव्हेंबर अखेरपर्यंत थंडीचा कडाका खूपच वाढला. ही थंडी सुरुवातीला सर्वांनाच हवीहवीशी वाटू लागली, थंडीचे सकारात्मक परिणाम देखील आंबा बागांमध्ये दिसू लागले. नोव्हेंबर ते डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील ७० टक्के आंबा कलमांना मोहोर आला. त्यानतंरच्या दहा-पंधरा दिवसांत उर्वरित २० टक्के झाडे देखील मोहोराने बहरली.

फुलकिडीमुळे बागायतदार चिंतेत मोहोराने बहरलेल्या आंबा बागा आता काळवंडल्या आहेत. मोहोर अक्षरशः करपला आहे. ९० टक्के मोहोरलेल्या आंब्याला दहा टक्के देखील फळधारणा झालेली नाही. त्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. आतापर्यंत लाखो रुपये खर्चुन खते, कीटकनाशक, बुरशीनाशकांच्या फवारण्या झाडांवर केल्या आहेत. याशिवाय कित्येक मजूर बागांमध्ये काम ाला आहेत. दहा टक्के आंबा उत्पादनात उत्पादन खर्च देखील भागण्याची शक्यता कमी आहे. तिसऱ्या टप्प्यात म ोहोर फुटण्याची प्रकिया सुरू झाली, परंतु त्यावर देखील फुलकिडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे बागायतदार सर्व बाजूंनी अडचणीत आला असून, याच मोहोरावर आता उत्पादनाची अपेक्षा देखील आहे.

RELATED ARTICLES

Most Popular