25.2 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRajapurराजापूरमध्ये पैशांचा पाऊस पाडतो सांगत लाखोंचा गंडा

राजापूरमध्ये पैशांचा पाऊस पाडतो सांगत लाखोंचा गंडा

साताऱ्यातील वाढे फाटा परिसरातील एका लॉजमध्ये घडला आहे.

साताऱ्यातील एका भामट्याने पैशाचा पाऊस पाडतो असे आमिष दाखवत राजापूरमधील एकाला तब्बल १३ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी साताऱ्यातील एका व्यक्तीवर शाहूपुरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीसांनी पत्रकारांना दिली. संतोष श्रवण लोखंडे (रा. सातारा) असे संशयित आरोपीचे नाव असल्याचे पोलीसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. याबाबत जहीर अब्बास मनचेकर (वय ४०, रा. विलये, ता. राजापूर, रत्नागिरी) यांनी फिर्याद नोंदविली आहे. संशयित आरोपी संतोष लोखंडेसोबत त्यांची साताऱ्यातील एका मित्राने ओळख करून दिली. तो पैसे दुप्पट करून देतो, अनेकांचा त्याने फायदा केला आहे, असे सांगण्यात आल्याने आपला त्याच्यावर विश्वास बसला, असेही फिर्यादीमध्ये मनचेकर यांनी नमूद केले आहे. संशयित आरोपीने ‘माझ्याकडे स्मशानी शक्ती आहे.

त्याचा वापर करून मी पैशांचा पाऊस पाडतो व पैसे डबल करून देतो, ‘असे सांगितले. त्यानंतर वेळोवेळी १३ लाख रुपये त्याला आपण दिले. मात्र, त्याने पैसे परत दिले नाहीत, असा आरोप फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे काही मित्रांची नावेही त्यामध्ये नमूद करण्यात आली असून त्यांचीही फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या तक्रारीनंतर शाहूपुरी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेण्यासाठी त्याचे घर गाठले. परंतु, संशयित आढळून आला नाही, असे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले. फसवणुकीचा हा प्रकार जुलै २०१८ ते एप्रिल २०१९ या कालावधीत राजापूर, रत्नागिरी तसेच साताऱ्यातील वाढे फाटा परिसरातील एका लॉजमध्ये घडला आहे. या घटनेची तक्रार फिर्यादी मनचेकर यांनी २ ऑगस्ट रोजी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular