30 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

‘या’ तारखेला जाहीर करणार CM पदाचा चेहरा! राऊतांनी अगदी वेळही सांगितली

विधानसभा निडवणुकीच्या मतदानानंतर बुधवारी समोर आलेल्या एक्झिट...

जिल्ह्यात सरासरी ६४ टक्के मतदान, प्रक्रिया शांततापूर्ण

सकाळच्या सत्रापासूनच मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. त्यानंतर...

भाजप ठरवणार निकाल की ‘निक्काल’, चाकरमानीही ठरणार प्रभावी

विधानसभेसाठी जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत झालेले मतदान हे...
HomeLifestyleपावसाळी पिकनिक प्लान करताय, तर घ्या थोडीशी स्वत:ची काळजी

पावसाळी पिकनिक प्लान करताय, तर घ्या थोडीशी स्वत:ची काळजी

उन्हाळा असो की पावसाळा. या दोन्ही काळामध्ये पर्यटनासाठी प्रवास करत असताना व्यक्तीला काही गोष्टींची काळजी आणि खबरदारी घ्यावी लागते.

पावसाळ्याला सुरूवात झाली असल्यानं अनेक लोक निसर्गरम्य ठिकाण किंवा धबधब्यांवर जाण्याचा प्लॅन बनवत असतात. पावसाळ्यात डोंगर रांगांमधील नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी आणि पावसाचा आनंद घेण्यासाठी अनेकजण सह्याद्रीच्या रांगांमध्येही फिरण्याचा विचार करत असतात. परंतु उन्हाळा असो की पावसाळा. या दोन्ही काळामध्ये पर्यटनासाठी प्रवास करत असताना व्यक्तीला काही गोष्टींची काळजी आणि खबरदारी घ्यावी लागते. अशावेळी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, याबाबत थोडक्यात जाणून घेऊयात.

फिरण्यासाठी जर तुम्ही लांबच्या प्रवासावर जात असाल तर त्यावेळी व्यक्ती दिवसभर प्रवास केल्यानंतर संध्याकाळी आराम करण्यासाची एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली पाहिजे. करण काही वेळा आपण ज्या ठिकाणी जात आहोत, त्या ठिकाणची इत्यंभूत माहिती व्यक्तीला असतेच असं नाही. त्यामुळं अशा वेळेस दिवस सुरू होण्यापूर्वी प्रवास सुरू करा आणि दिवस मावळत आला असता प्रवास थांबवून विश्रांती घेणे देखील तेवढेच गरजेचे आहे.

अनेकदा दऱ्याखोऱ्यांमध्ये, धरणाजवळ किंवा डोंगरांच्या कपारीला काही लोक जीव धोक्यात घालून सेल्फी किंवा फोटो काढण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळं कुठल्याही पर्यटनस्थळी जाताना किमान आठ ते दहा जणांचा ग्रुप सोबत असायला हवा. याशिवाय फोटो काढताना सुरक्षित आणि चांगल्या ठिकाणाहून फोटो काढायला हवेत. जेणेकरून सुरक्षितत जपली जाईल.

प्रवासात असताना प्रत्येकाने खाण्याच्या गोष्टींवर,आहारावर लक्ष देणे गरजेचे आहे. जास्त तेलकट किंवा जड पदार्थांचं सेवन करणं विशेष करून टाळलच पाहिजे. याशिवाय चहा, कॉफी किंवा कोल्ड्रिंक्सचं सेवन अति प्रमाणात करणं टाळलं पाहिजे. कारण एक तर वेगळ्या वातावरणात प्रवास करत असताना, तब्येत बिघडण्याची शक्यता असते. त्यासाठी ताजी फळं किंवा हिरव्या पालेभाज्यांचं सेवन करायला हवं, कारण हे पदार्थ सहजरित्या पचायला मदत होते. याशिवाय उलटी,  खोकला आणि तापाच्या गोळ्या सोबत ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळं प्रवासात असताना तुम्हाला काही शारीरिक त्रास व्हायला लागला तर डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही.

RELATED ARTICLES

Most Popular