HomeRatnagiriगिर्यारोहणाचे साहसी प्रशिक्षण पूर्ण करत, आकाशची माउंट युमानची यशस्वी चढाई

गिर्यारोहणाचे साहसी प्रशिक्षण पूर्ण करत, आकाशची माउंट युमानची यशस्वी चढाई

त्याने गिर्यारोहणाचे एक महिन्याचे साहसी प्रशिक्षण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग अॅण्ड अलाईड स्पोर्ट्स या संस्थेच्या माध्यमातून पूर्ण करून आकाश रत्नागिरीत परतला आहे.

हल्ली अनेकजण आपले विविध छंद जोपासत असतात. बरेचशे ग्रुपने तर कधी एकटे देखील विकेंडला फिरायला बाहेर पडतात. काही ट्रेकिंगला जातात तर काही गड किल्ले पालथे घालत असतात. अशाच एका रत्नागिरीतील शिरगाव-आडी येथील नवोदित गिर्यारोहक आकाश पालकर यांने हिमालय प्रदेशातील लाहौल भागातील माउंट युमान शिखरावर यशस्वी चढाई करत राष्ट्रध्वज फडकावून रत्नागिरीकरांची मान उंचावली आहे. त्याचप्रमाणे, भविष्यामध्ये गिर्यारोहण क्षेत्रामध्ये इच्छूक असणाऱ्या मुलांना मार्गदर्शन करणार असल्याचा उद्देश स्पष्ट केला.

आकाशने हिमालय प्रदेशातील लाहौल भागात असलेले माउंट युनाम हे ६.१११ मीटर उंचीचे शिखर त्याने यशस्वीपणे सर केले. त्यानंतर त्याने गिर्यारोहणाचे एक महिन्याचे साहसी प्रशिक्षण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग अॅण्ड अलाईड स्पोर्ट्स या संस्थेच्या माध्यमातून पूर्ण करून आकाश रत्नागिरीत परतला आहे. या प्रशिक्षणामध्ये त्याने क्लायबिंग वॉल, गिर्यारोहण प्रशिक्षण आणि चाचणी याबरोबरच धावणे, नकाशा वाचन चाचणी, पर्वतारोहण व्याख्यान, प्रशिक्षणाच्या शेवटच्या भागात लोड फेरी ट्रेकिंग पाठीवर २५ ते ३० किलोची बॅग घेऊन ८ किमी धावणे, अशा वेगवेगळ्या पद्धतीने ट्रेनिंग यशस्वीपणे पूर्ण केले. तसेच त्या संबंधित परीक्षा देखील पास झाला.

नवोदित गिर्यारोहक आकाश पालकर  याने म्हटले आहे कि, या क्षेत्रात आवड असणाऱ्या मुलांना माउंटेनिअर्स असोसिएशन रत्नागिरी या संस्थेमार्फत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्नशील राहणार आहे. येथील मुलांना चांगल्या प्रकारे गिर्यारोहकविषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण यासाठी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचा असोसिएशनचा उद्देश आहे. जेणेकरून तरुणांना गिर्यारोहणातील प्रशिक्षणासाठी रत्नागिरी बाहेर जाण्याची गरज भासू नये.

RELATED ARTICLES

Most Popular