27.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRajapurराजापूर पंचायत समितीच्या इमारतीसाठी हालचाली - किरण सामंत

राजापूर पंचायत समितीच्या इमारतीसाठी हालचाली – किरण सामंत

नव्या इमारतीचा प्रस्ताव लालफितीत अडकला होता.

गेली अनेक वर्षे रखडलेल्या राजापूर पंचायत समितीच्या नव्या इमारतीच्या प्रस्तावाला आता चालना मिळणार आहे. राजापूर तालुका पंचायत समितीअंतर्गत असलेल्या विविध विभागांची कार्यालये एकाच छताखाली यावीत यासाठी नव्या इमारतीचा प्रस्ताव लालफितीत अडकला होता. आमदार किरण सामंत यांनी या प्रकरणी लक्ष घातले असून पंचायत समिती अधिकाऱ्यांची चर्चा करून या प्रस्तावाबाबत माहिती घेतली. पंचायत समितीच्या नव्या इमारतीचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आमदार सामंत यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावे असलेली जागा पंचायत समितीच्या नावे व्हावी यासाठी देखील प्रयत्न सुरू आहे; मात्र शासनदरबारी अनेक त्रुटी काढण्यात आल्या असल्याने हा अद्याप प्रलंबित आहे.  पंचायत समितीने दिलेल्या प्रस्तावानुसार सार्वजनिक बांधकाम विभागानेही सर्व कागदपत्राची पूर्तता करत महसूल विभाग व वनविभागाच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर हा प्रस्ताव सादर केला.

मात्र या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या नावे असलेल्या जागेमधील २२ गुंठे जागा आपल्याला सोडण्यात यावी, अशी अट घालत प्रस्ताव सादर केला. सध्या पंचायत समितीच्या ताब्यात ११० गुंठे जागा असून यामधील २२ गुंठे जागा सार्वजनिक बांधकाम विभाग, १६ गुंठे जागा गोडावूनसाठी म्हणजेच महसूल विभागला सोडण्यात येणार आहे. पंचायत समिती व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावामुळे या संदर्भात मंत्रालयात बैठक झाली; मात्र त्रुटी असल्याने संबंधित प्रस्ताव त्रुटी पूर्ण करण्यासाठी पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवून दिला. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्रुटी पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवून देत त्रुटी पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यामुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने त्रुटीची पूर्तता करत ऑगस्ट २०२३ मध्ये प्रस्ताव पुन्हा शासनाकडे पाठवला; मात्र त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याची बाब समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर बुधवारी आमदार किरण सामंत यांनी पंचायत, समितीतील अधिकाऱ्यांशी चर्चा, करून या प्रस्तावाची माहिती घेतली. जागा पंचायत समितीच्या नावे होऊन पंचायत समितीच्या इमारतीचा प्रस्ताव, तातडीने मार्गी लावण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार सामंत यांनी दिली. या वेळी, तालुकापमुख दीपक नागले, भाजपचे रवींद्र नागरेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अजित नारकर, अरविंद लांजेकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular