गुहागर नगर पंचायतीवर भाजप – शिवसेना (शिंदे गट) यांची एकहाती सत्ता आल्याने उपनगराध्यक्ष व समिती सभापतीपदाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपा – शिवसेना युतीच्या दोन्ही बाजूने स्वीकृत नगरसेवकपदासाठी अनेक जण इच्छुक असल्याचे समजते. गुहागर नगर पंचायतीवर भाजप-शिवसेना युतीचे नगराध्यक्षपदासह १३ नगरसेवक निवडून आले आहेत. आता उपनगराध्यक्षांसह समिती सभापती व स्वीकृत नगरसेवकपदासाठीच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. नगराध्यक्षपदावरून निवडणुकी अगोदर भाजप व शिवसेनेमध्ये चुरस निर्माण झाली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणाला युतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी नीता विकास मालप यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
नगराध्यक्ष नीता मालप यांच्यासह भाजपचे ६ तर शिवसेनेचे ७ असे १३ नगरसेवक निवडून आले आहेत. त्याचबरोबर उर्वरित ४ जागांवर उबाठा शिवसेना २. राष्ट्रवादी १ तर मनसे पुरस्कृत १ अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. युतीमध्ये नगराध्यक्षपद भाजपकडे गेल्याने आता उपनगराध्यक्षपद शिवसेनेच्या वाट्याला आले आहे. यामुळे शिवसेनेमध्ये अंतर्गत चुरस निर्माण झाली आहे. उपनगराध्यक्षपदाचे प्रम ख दावेदार म्हणून प्रदीप बेंडल यांचे नाव निवडणुकीपूर्वीपासून चर्चेत होते. केवळ ४ मतांनी विजयी झालेले अम ोल गोयथळे यांच्या नावांची चर्चा आता सुरू झाली आहे. याबाबतचा निर्णय पालकमंत्री सामंत घेतील असे बोलले जात आहे. तर प्रदीप बेंडल हे ९१ मताधिक्याने निवडून आले. सुजित साटले यांनीही चांगले मताधिक्य घेतले आहे. यामुळे उपनगराध्यक्षपदी बेंडल की गोयथळे की सुजित साटले यांपैकी कोण विराजमान होणार याविषयर उत्सुकता आहे.
सभापती निवडीच्या हालचाली – गुहागर नगर पंचायतीच्या ६ समिती सभापतीची निवड केली जाणार आहे. यामध्ये बांधकाम समिती सभापती, आरोग्य व स्वच्छता समिती सभापती, पाणीपुरवठा व जलः निस्सारण समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापती, शिक्षण समिती सभापती आणि मागासवर्गीय समिती सभापती ही पदे आहेत. या पदाच्या वाटपात बांधकाम समिती सभापती हे महत्वाचे पद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. उर्वरित ५ समिती सभापतीपदामध्ये मागासवर्गीय समिती सभापतीपद रिक्त राहण्याची शक्यता आहे. यामुळे ४ समिती सभापतीपदामध्ये भाजप व शिवसेनेला कोणती खाती मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.
स्विकृत नगरसेवक – नगराध्यक्षपदाच्या पदग्रहणानंतर स्वःत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी बैठक बोलावणार आहेत. नगरसेवकांच्या संख्याबळाआधारे स्विकृत नगरसेवक निवडले जाणार असून शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी एक स्विकृत नगरसेवक निवडता येईल. भाजपतर्फे स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी ५ जणांची नावे चर्चेत आहेत. ज्या प्रभागाच्या शेजारील प्रभागामध्ये भाजपचे नगरसेवक पराभूत झाले, दुसरीकडे शिवसेनेमध्ये जो सर्वाधिक क्रियाशील सदस्य आहे त्याला स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडण्यासाठीची यादी तयार करण्यात आली आहे.

