भाजपचे आ. नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असून त्याचा निषेध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर खा. नारायण राणे यांनी नितेश राणे यांचे ते वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे. यावेळी त्यांनी नितेश राणे यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. नितेश राणे यांनी आत घुसून मारू असे जे काही वक्तव्य केले होते ते चुकीचे होते असं त्यांनी मान्य केले आहे. पण भारतात राहून देशाच्या विरोधी कृत्य करणाऱ्या लोकांच्या विरुद्ध देशातील किती मुस्लीमांनी आवाज उठवला आहे असा प्रश्नही त्यांनी केला आहे. नितेश बोलला म्हणून त्याच्या विरुध्द आवाज उठवला जात आहे. पण नितेशचे तोंड बंद केल, तर हजार नितेश राणे तयार होतील असेही नारायण राणे यावेळी म्हणाले.
दरम्यान यावेळी नारायण राणे यांनी शरद पवारांवर जोरादार टिका केली. शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी काय केलं? त्यांनी महिलांवर होणारे अत्याचार का थांबले नाहीत. त्या वेळची यादी काढू का? असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. शिवाय ज्या वेळी तुम्ही मुख्यमंत्री होता त्यावेळी तुम्ही महिलांना पाच हजार का दिले नाहीत असा सवाल त्यांनी केला आहे. शरद पवारांनी लाडकी बहिण योजनेवर बोलताना महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित केला होता. त्याला राणे यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ही जोरदार टिका केली. उद्धव ठाकरे यांना काही समजत नाही. मग ते मुख्यमंत्री कसे होणार असे ते म्हणाले.
अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना त्यांनी काही केलं नाही केवळ फुकट मानधन घेतलं अशी टिका त्यांनी केली. यावेळी त्यांनी संजय राऊत यांनाही सोडले नाही. संजय राऊत यांना अक्कल नाही. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत म्हणजे महाराष्ट्र नाही. त्यामुळे त्यांच्यावर अधिकता काही बोलणार नाही असही सांगायला आपल्याला पंतप्रधानपदाची ऑफर विरोधकांनी दिली होती असा गौप्यस्फोट नितीन गडकरी यांनी केला होता. त्यावर नारायण राणे यांनी अधिक बोलणे टाळले. ते माझे चांगले मित्र आहेत. ते काय बोलले याबाबत आपल्याला काही कल्पना नाही. शिवाय त्या विषयावर आपल्याला काही बोलायचं नाही असंही राणे यावेळी म्हणाले. यावर बोलणे राणे यांनी टाळले.