27.9 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeMaharashtra२ जानेवारीची राज्यसेवा पूर्व परीक्षा अनिश्चित काळासाठी लांबणीवर

२ जानेवारीची राज्यसेवा पूर्व परीक्षा अनिश्चित काळासाठी लांबणीवर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी २ जानेवारीची राज्यसेवा पूर्व परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

कोरोना काळापासून अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यामध्ये अनेक शाळा, कॉलेज, बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्याचप्रमाणे आरोग्य विभाग, एमपीएससी सारख्या शासकीय परीक्षा सुद्धा कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे रद्द करण्यात आल्या. पण त्यामुळे परीक्षेसाठी वयाची मर्यादा संपणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची शेवटची परीक्षेला बसण्याची संधी हुकली. मात्र तसे न घडता, शासनाने अशा परीक्षार्थींसाठी २ जानेवारी रोजी विविध परीक्षा केंद्रांवर नियोजित केली होती, परंतु, त्या परीक्षेच्या मध्ये सुद्धा अडचणी निर्माण झाल्या आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी २ जानेवारीची राज्यसेवा पूर्व परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. २ जानेवारी रोजी राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. मात्र, कोरोना काळात परीक्षा न झाल्याने वाढीव सवलत देण्यात आली होती. या सवलतीचा लाभ मिळावा यासाठी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे एमपीएससीने पत्रकात म्हटले आहे.

एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे, १ मार्च, २०२० ते १७ डिसेंबर २०२१ कालावधीत वयोमर्यादा ओलांडली त्या उमेदवारांना संधी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढे होणाऱ्या परीक्षेसाठी २८ डिसेंबर २०२१ ते १ जानेवारी पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज भरण्यासाठी १ जानेवारी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. भारतीय स्टेट बँकेच्या चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरून कार्यालीयन वेळेत रक्कम भरायची आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ४ ऑक्टोबर रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या होत्या. २ जानेवारी, २०२२  रोजी पूर्व परीक्षा होणार होती तर मुख्य परीक्षा दिनांक ७, ८ आणि ९ मे २०२२  रोजी होणार होती. या परीक्षेची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.

RELATED ARTICLES

Most Popular