27.5 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...

जिल्ह्यात रंगणार गुरू विरुद्ध शिष्य लढत तटकरे-सामंत आमनेसामने

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या...
HomeMaharashtraमहावितरणाकडून सर्व सामान्य जनतेला “करंट”

महावितरणाकडून सर्व सामान्य जनतेला “करंट”

महावितरणाने इंधन समायोजन आकार म्हणजे FAC यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ केली आहे.

महावितरणकडून वीज दरामध्ये मोठी वाढ करण्यात आली असून एक प्रकारे ग्राहकांना “करंट” देण्यात आला आहे. महावितरणाने इंधन समायोजन आकार म्हणजे FAC यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ केली आहे. त्यामुळे आधीच वाढत्या महागाईमुळे हैराण असलेल्या सर्वसामान्य जनतेला आता वीजेसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

कोळसा आणि इंधनाचे दर वाढल्यानंतर इंधन समायोजन आकारामध्ये महावितरणकडून वाढ करण्यात येत असते. त्याला MERC यांची परवानगी आवश्यक असते. जून महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत जो इंधन समायोजन आकार आहे त्यामध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे.

मार्च २०२२ ते मे २०२२ पर्यंत जो इंधन समायोजन आकार होता, त्याच्यापेक्षा अधिक पटीने सध्याचा इंधन समायोजन आकार वाढवण्यात आला आहे. जानेवारी २०२२ मध्ये देखील महावितरणकडून प्रति युनिट २५ पैशांची दरवाढ करण्यात आली होती. त्यावेळी देखील महावितरणने समायोजन आकाराचेच कारण दिले होते.

महावितरणकडून वीज दरात मोठी वाढ केल्याने राज्यातील जनतेला एक प्रकारचा शॉकच लागला आहे. इंधन समायोजन आकारात वाढ केल्याने ग्राहकांना जादा आकाराने वीज खरेदी करावी लागणार आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना वीजेसाठी जास्तीचे पैसे भरावे लागणार आहेत.

इंधन समायोजन आकाराची वाढ खाली दिल्याप्रमाणे करण्यात येणार आहे.

० ते १०० युनिट आधी १० पैसे, आता ६५ पैसे

१०१ ते ३०० युनिट आधी २० पैसे, आता १ रुपये ४५ पैसे

३०१ ते ५०० युनिट आधी २५ पैसे, आता २ रुपये ०५ पैसे

५०१ युनिटच्या वर आधी २५ पैसे, आता २ रुपये ३५ पैसे

RELATED ARTICLES

Most Popular