26.1 C
Ratnagiri
Thursday, July 18, 2024

जिल्ह्यात २० तारीखे पर्यंत रेड अलर्ट…

जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून...

‘सिव्हिल’मधील समस्यांचा वाचला पाढा – शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक

गोरगरिबांचा आधार असलेल्या जिल्हा रुग्णालयाची वरून रंगरंगोटी...

चिपळूणमध्ये विहिरीतील पाण्यात मगरीचे पिल्लू, वनविभागाने पकडले

शहरातील वाणीआळीतील एका विहिरीत पुराच्या पाण्याबरोबर मगरीचे...
HomeRatnagiriरत्नागिरीमध्ये म्युकरमायकोसीसचे वाढते प्रमाण चिंताजनक

रत्नागिरीमध्ये म्युकरमायकोसीसचे वाढते प्रमाण चिंताजनक

कोरोना व्हायरसच्या संक्रमणामधून बाहेर पडल्यावर अजून एक नवीन संकट आपण पहिले आहे. जे रुग्ण कोरोना होऊन बरे झाले आहेत, अशा रुग्णांना शक्यतो करून म्युकरमायकोसीस म्हणजेच काळी बुरशी सदृश्य आजाराला सामोरे जावे लागत आहे. या आजारामुळे अनेकांच्या डोळ्यांवर परिणाम होताना निदर्शनास आले आहे.

रत्नागिरीमध्ये कोरोनाच्या दुसर्या लाटेची परिस्थिती एवढी भयानक आहे, कि दिवसाला संक्रमित रुग्ण ५०० ते ६०० च्या संख्येमध्ये सापडत आहेत. त्याच पाठोपाठ म्युकरमायकोसीस या भयंकर आजाराला सुद्धा कोरोनामधून बरी झालेली लोक बळी पडताना दिसत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण १० म्युकरमायकोसीसचे रुग्ण आढळले असून, राज्यातील या रुग्णांची संख्या ७३५९ एवढी आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर येथे म्युकरमायकोसीस आजाराची एकूण ४२३८ रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये म्युकरमायकोसीसचे २५ रुग्ण आढळले असून, रत्नागिरीमध्ये १० तर रायगडमध्ये १५ रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य खात्याच्या सूत्रांनी दिली.

म्युकरमायकोसीस या आजाराचे प्रमाण लहान मुलांमध्येही जास्त प्रमाणात आढळू लागल्याने डॉक्टर आणि पालक वर्गामध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे. मुंबईतील या आजारामुळे तीन लहान बालकांचे डोळे काढले गेले असल्याचे धक्कादायक वृत्त समजले आहे. कोरोनापेक्षा या आजाराची भीती जास्त वाटत असल्याचे अनेक डॉक्टरांनी म्हटले आहे. मधुमेह असलेल्या रुग्णांना तसेच कोरोनावरील औषधांचा डोस जास्त प्रमाणात झाला असेल आर, अशा रुग्णांना म्युकरमायकोसीस आजाराची बाधा होण्याची शक्यता जास्त असते.सध्या या आजाराचा संसर्ग जास्त असून त्यावरीळ औषध मात्र अपुरी आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular