मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी अपघातांची मालिका सुरूच आहे. रस्त्यावरील खड्डे आणि त्याचे डागडुजीचे सुरु असलेले वर्षोनुवर्षे कामकाज काही पूर्ण होण्याचे नाव घेत नाही आहे. त्यामुळे महामार्गावरील रस्ते अद्यापही न बुजवल्याने अशा प्रकारचे अपघात घडत असून, अनेकानी अशा अपघातांमध्ये जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे लवकरात लवकर महामार्गाच्या डागडुजीचे काम पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
महामार्गाच्या विविध ठिकाणावर काम सुरु आहेच. त्यामुळे न भरलेले मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे अधिकच धोकादायक बनत चालले आहेत. निवळी-हातखंबा मार्गावर अपघात होत असल्याने या खड्ड्यांकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. निवळी नजीकच्या रांभोळकरीण मंदिरापुढे दुचाकी घसरुन अपघात झाला. यात दुचाकीवरील पती किरकोळ जखमी झाला असून पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची ही घटना बुधवारी घडली.
घडलेल्या घटनेप्रमाणे, बुधवारी सकाळी मंगेश भिकाजी भोंगले वय ४२, रा. तारवेवाडी हातखंबा, रत्नागिरी हे आपल्या ताब्यातील पॅशन प्रो दुचाकी एमएच- 0८ एएच- २३६८ घेऊन पत्नी निराली हिच्या सोबत तारवेवाडी ते शांती ढाबा असे प्रवास करत होते. ते रांभोळकरीण मंदिरापुढे आले असता त्यांच्या दुचाकीचे चाक खड्डयात गेल्याने अचानक दुचाकी घसरली. आणि निराली या पाठच्या पाठी पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. महाम्रागावरील खड्डे हे अनेकांच्या जीवावर बेतले असल्याचे वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या घटनेमुळे समोर आले आहे. या अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलिस हवालदार वाजे करत आहेत.

