27.5 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...

जिल्ह्यात रंगणार गुरू विरुद्ध शिष्य लढत तटकरे-सामंत आमनेसामने

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या...

रघुवीर घाटात पुन्हा कोसळली दरड…

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, आज दिवसभर...
HomeRatnagiriमुंबई गोवा महामार्ग ठेकेदार केंद्रातील वजनदार मंत्र्यांचा “खास”

मुंबई गोवा महामार्ग ठेकेदार केंद्रातील वजनदार मंत्र्यांचा “खास”

वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनलेला महामार्ग म्हणजे मुंबई गोवा. महामार्गावरील खड्याबाबत प्रशासन बघ्याची भूमिका घेत असून यावर लक्ष वेधण्यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली आहेत. मात्र महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस खूपच दयनीय बनली आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अनोखे आंदोलन छेडण्यात आले. मनसे उपतालुकाध्यक्ष नंदकुमार फडकले यांच्यासह मनसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

आरवली ते तळेकांटे या भागामध्ये तर ठेकेदारांच्या अनियमितपणामुळे खूपच दुरावस्था झाली आहे. अनेकवेळा आवाज उठवूनही प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे बोलले जात आहे. या रस्त्यासाठी नियुक्त करण्यात आलेला ठेकेदार हा केंद्रातील एका वजनदार मंत्र्यांचा “खास” असल्याने येथील स्थानिक लोकप्रतिनिधी ठेकेदारा विरोधात आवाज उठवू शकत नसल्याची जोरदार चर्चा आहे. हि वस्तुस्थिती काही लोक प्रतिनिधी बोलून दाखवत आहेत.

रविवारी धामणी परिसरातील एका खड्यात दिवसभरात आठ दुचाकीस्वार पडून अपघात झाले. यामध्ये अनेक दुचाकीचालक जखमी झाले तर वाहनाचेही नुकसान झाले आहे. यावेळी संबंधित ठेकेदाराचा प्रतिकात्मक पुतळा बनविण्यात आला. व त्यावर “मी मुंबई गोवा महामार्गाचा कामचोर व ना….लायक ठेकेदार आहे, वाहने सावकाश हाका” असा फलक लावण्यात आला होता. या पुतळ्याचे अनावरण करून महामार्गावर पडलेले खड्डे जेसीबीच्या सहाय्याने मनसे कार्यकर्त्यानी भरले.याकामी उद्योजक संदीप मयेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

मुंबई गोवा महामार्गावर खड्डेच खड्डे पडले असल्याने, आंदोलने, मोर्चे काढूनही प्रशासन जाग होत नसल्याने, प्रशासन मात्र ढिम्म असल्याने मनसे आक्रमक होऊन रस्त्यावर उतरली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular