26.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeChiplunराष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे दहा दिवसात भरा नाहीतर...

राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे दहा दिवसात भरा नाहीतर…

मुंबई-गोवा महामार्गावर तर खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची दमछाक होत आहे. जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या दोन वर्षापासून रस्त्यांची सुरु असलेली डागडुजी अद्याप पूर्ण झाली नाही आहे. पावसाला आत्ताशी सुरुवात झाली असून, पहिल्या पावसातच रस्त्याची ऐशी तैशी झालेली दिसून येत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर तर खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची दमछाक होत आहे. जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. शारीरिक, मानसिक त्रास आणि वाहनाचे नुकसान होते ते वेगळेच सहन करावा लागत आहे.

शिवसेनेचे चिपळूण तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे दहा दिवसात भरा नाहीतर, या खड्ड्यांमध्ये भात लावणी करण्यासाठी परवानगी द्या, अशी मागणी केली. अनेक महिने सुरु असलेले खड्डे भरण्याचे काम आणि रस्त्याचे होत असलेले नुकसान लक्षात घेता, पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यात सर्व पाणी भरत असल्याने अपघातांच्या घटना वाढतच आहेत.

संदीप सावंत यांनी ही मागणी अधीक्षक अभियंता यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्यात म्हटले आहे की, काही वर्षापासून परशुराम ते आरवली मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. हे काम संथगतीने सुरू असल्याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करत असताना सर्विस रोड तयार करण्यात आले आहेत; मात्र या रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. ही परिस्थिती वालोपे रेल्वे स्टेशनपासून सावर्डे, आगवेपर्यंतच्या सर्विस रोडवर आहे. या रस्त्यावर पावसाळ्यात अनेक किरकोळ अपघात घडले आहेत. मोठे अपघात घडल्यास जबाबदार कोण, असा नागरिकांमधून थेट प्रश्न विचारला जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular