27.8 C
Ratnagiri
Saturday, October 1, 2022

दोन जिल्ह्यांसाठी वन्य प्राण्यांसाठी अद्ययावत रुग्णवाहिका दाखल

रत्नागिरीसह सिंधुदुर्गमधील वन्य प्राण्यांच्या बचावासाठी वनविभागाच्या खारफुटी...

गुहागर पोलिसांनी पलायन केलेला आरोपीच्या ४ तासात मुसक्या आवळल्या

आरोपीला न्यायालयातून परत नेत असताना लघुशंकेला जायचे...

कडवईच्या डॉक्टरांची हजारो रुपयांची ऑनलाईन फसवणूक

जिल्ह्यातील ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या...
HomeMaharashtraनवीन नियम! मोटर सायकलवर पाठी बसणाऱ्यालाही हेल्मेट बंधनकारक

नवीन नियम! मोटर सायकलवर पाठी बसणाऱ्यालाही हेल्मेट बंधनकारक

मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेनं दुचाकीस्वार आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीनं हेल्मेट परिधान केलेलं नसेल तर कारवाई केली जाईल अशी माहिती देणारं पत्रकच काढलं आहे.

मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेनं आता विनाहेल्मेट दुचाकी स्वारांविरोधात कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत विनाहेल्मेट दुचाकी चालवण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे आता दुचाकी चालकासह पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक करण्याचा निर्णय मुंबई वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेनं दुचाकीस्वार आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीनं हेल्मेट परिधान केलेलं नसेल तर कारवाई केली जाईल अशी माहिती देणारं पत्रकच काढलं आहे.

मुंबई शहरामध्ये अनेक मोटार सायकलस्वार हे विनाहेल्मेट मोटारसायकल चालवतात. तसेच मोटार सायकल चालविणाऱ्याच्या मागे बसलेली व्यक्ती देखील हेल्मेट परिधान करत नाही. वास्तविक पाहता मोटार सायकल चालवणारी आणि त्याच्या पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीनंही हेल्मेट परिधान करणं हे वाहन कायदा १९८८ कलम १२६ सह १९४ (ड) अन्वये बंधनकारक आहे.

विना हेल्मेट मोटारसायकल चालविल्यास वाहन कायद्यामध्ये ५०० रुपये दंडाची तरतूद आहे. तसेच तीन महिन्यांसाठी लायसन्स निलंबीत करण्याची तरतूद आहे”, असं मुंबई पोलिसांनी काढलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांच्या या परिपत्रकानुसार आता मुंबईत मोटारसायकल चालकासह पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. तशीच या नियमाची अंमलबजावणी तात्काळ सुरू करण्यास सांगितलं आहे. तर या विरोधातील कारवाई १५ दिवसांनी सुरू करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. आता याचा प्रयोग मुंबईत करून मग हळूहळू राज्यभर राबवणार का हे आता दुचाकीस्वारांसाठी महत्वाचे ठरणार आहे.

वाहतुकीसाठी चालकाला हेल्मेट सक्ती योग्य आहे परंतु, आता पाठी बसणाऱ्याला देखील हेल्मेट सक्तीचा केलेला नियम कितीसा योग्य वाटतो! याबाबत अनेक मतांतरे पहावयास मिळत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular