30.3 C
Ratnagiri
Thursday, March 28, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeMaharashtraमुंबई लगतच्या तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेण्यासाठी एमटीडीसी मार्फत विशेष बससेवा

मुंबई लगतच्या तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेण्यासाठी एमटीडीसी मार्फत विशेष बससेवा

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं मुंबई लगतच्या तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेण्यासाठी ‘महादर्शन‘ ही विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे.

राज्यात विविध ठिकाणची पर्यटनस्थळे पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध व्हावीत यासाठी आणि एमटीडीसी विविध उपक्रम राबवत असते. प्रत्येक जिल्ह्या मधील एसटी मंडळ देखील विविध योजना राबवताना दिसत आहे. मुंबई दर्शन देखील अनेकांना करायची इच्छा असते, परंतु, असणारी अपुरी माहिती आणि होणारे ट्राफिक लक्षात घेता ते शक्य होत नाही. यासाठी मुंबई आणि उपनगर लगतच्या परिसरातील तीर्थस्थळे फिरण्यासाठी विशेष योजना एमटीडीसी मार्फत राबविण्यात येत आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं मुंबई लगतच्या तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेण्यासाठी ‘महादर्शन‘ ही विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे. अभिनेता मिलिंद गुणाजी आणि दिलीप ताहील यांच्या उपस्थितीत रविवारी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमामध्ये मुंबईचं सिद्धिविनायक मंदिर, अंबरनाथचं तब्बल १०६० वर्ष जुनं प्राचीन शिवमंदिर आणि टिटवाळ्याचं महागणपती मंदिर ही ३ मंदिरं पर्यटकांना दाखवली जातील. सोबतच या ३  मंदिराचा इतिहास, माहिती सुद्धा पर्यटकांना दिली जाईल.

मुंबई शहर फिरण्यासाठी आलेले पर्यटक मुंबई दर्शन करण्यास प्राधान्य देत असतात. याच पर्यटकांना मुंबई शहर आणि उपनगरातली काही प्रमुख मंदिरं एका दिवसात फिरता यावीत आणि त्यामाध्यमातून ही मंदिरं देशात आणि जगात माहिती व्हावीत, त्यांचा इतिहास सर्वांना कळावा या उद्देशानं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने महादर्शन हा उपक्रम सुरू केला आहे.

मुंबईत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सिद्धिविनायक मंदिरातून या उपक्रमाची सुरुवात झाली. यानंतर अंबरनाथच्या शिवमंदिरात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या उपक्रमाचं स्वागत केलं. यावेळी अभिनेते मिलिंद गुणाजी आणि दिलीप ताहील हे सुद्धा उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular