26.1 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriसंपूर्ण कोकण हायवे पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल नाही

संपूर्ण कोकण हायवे पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल नाही

कोकण हायवे अभियानातील एक महत्त्वाचे आणि मोठे यश. कोकण हायवे साठी कायदेशीर संघर्ष करणारे वकील चिपळूणचे सुपुत्र अडवोकेट ओवेस पेचकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन. कोकण हायवे संपूर्ण 500 किलोमीटरचा महामार्ग संपूर्ण बांधून पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल या हायवेवर सुरू करू नये, अशी भूमिका उच्च न्यायालयात ओवेस पेचकर यांनी घेतली आणि ही मागणी शासनाने मान्य केली. ही खूप महत्त्वपूर्ण घटना आहे.

जागरूक नागरिक आणि त्यांचा सकारात्मक दबाव गट हा कोकणात चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरता आवश्यक आहे. कोकण हायवे समन्वय समिती च्या माध्यमातून आपल्या मागण्या मधील एक मागणी न्यायालयाच्या माध्यमातून मंजूर करून घेतल्याबद्दल आपल्या समन्वय समितीच्या कायदा विभागाचे प्रमुख ओवेस पेचकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि समस्त कोकणवासियांची च्या वतीने धन्यवाद.

कोकण हायवे समन्वय समिती म्हणून आपण सातत्याने आपल्या अभियानाच्या व आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या मागण्या लावून धरल्या तर शासकीय यंत्रणाना त्यावर काम करावेच लागेल. आणि म्हणून संघटितपणे कोकणावर होणाऱ्या अन्यायाबद्दल सातत्याने बोलणे आवश्यक आहे. आवश्यक तेथे न्यायालयातून न्याय मिळवणे गरजेचे आहे. संपूर्ण कोकण साठी एकत्रित आवाज उठवण्याचे काम कोकण हायवे समन्वय समिती करणार आहे.

कोकणातील अनेक सामाजिक संस्था, मुंबईकर ग्रामस्थ मंडळे, शिक्षण संस्था कोकण हायवे अभियानात आणि जनआंदोलनात सहभागी होत आहेत आणि आपल्या पाठिंब्याची पत्र देत आहेत. या सर्व संस्थांची देखील मनापासून धन्यवाद.

16 जुलै रोजी आपण भव्य ऑनलाईन कोकण हायवे जनआंदोलन परिषद आयोजित करीत आहोत. युट्युब आणि फेसबुकच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत कोकण हायवे समितीच्या मागण्या आणि अभियान पोहोचवण्यासाठी या परिषदेत सहभागी व्हा.

– कोकण हायवे समन्वय समिती

RELATED ARTICLES

Most Popular