27.9 C
Ratnagiri
Tuesday, February 7, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeMaharashtraसोशल मिडीयाच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर, मुंबई पोलीसांची नजर

सोशल मिडीयाच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर, मुंबई पोलीसांची नजर

देशासह राज्यामध्ये विविध जाती धर्माचे लोक वास्तव्यास आहेत. सध्या राज्यामध्ये विविध धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सोशल मिडिया किंवा प्रत्यक्षरित्या प्रयत्न केले जात आहेत. काही समाज कंटकांकडून जातीय तेढ निर्माण करत दंगली घडवून आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यात मुंबईत देखील आता भोंगा प्रकरणामुळे वातावरण अधिक दुषित होताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.

मुंबई पोलिसांनी चार महिन्यांत एकूण १२,८०० सोशल मीडिया पोस्ट हटवल्या आहेत. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील या पोस्टच्या माध्यमातून समाजात हिंसाचार आणि लोकांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु होते. त्यामुळे या पोस्टविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने जानेवारी महिन्यात ५ हजार ७५४,  फेब्रुवारीत ४ हजार २५२, मार्चमध्ये ३ हजार ९५८ पोस्ट हटवल्या आहेत. राज्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र एसआयडीची टीम दररोज ३० ते ३५ समाजविरोधी पोस्टवर कारवाई करत आहे.

हिंदू-मुस्लीम वाद हा केवळ केंद्र सरकारच्या अपयश झाकण्यासाठीच उकरून काढलेला मुद्दा आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करु पाहणाऱ्या नेत्यांच्या सभांना राज्य सरकारने परवानगी देऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. नाना पटोले म्हणाले की, इंधनदरवाढ, महागाईवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी धार्मिक मुद्दे पुढे करून वातावरण बिघडविण्याचे षडयंत्र असून जे लोक राज्यातील सामाजिक एकोपा, शांतता संपवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.

RELATED ARTICLES

Most Popular