26.7 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeMaharashtraसाकीनाका रेप केस, महिला आयोग आक्रमक

साकीनाका रेप केस, महिला आयोग आक्रमक

मुंबईमध्ये गणपतीच्या आगमनाची तयारी सुरु असताना भररस्त्यात हि घटना घडते याचा अर्थ आरोपी अतिशय बिन्दास्त पणे वावरत आहेत, त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही आहे. आरोपींना कोणाचीही भय भीती राहिलेली नाही.

मुंबईमध्ये साकीनाका परिसरात एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात रॉड घुसवला गेला आहे. उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणावरून राज्यात चांगलीच खळबळ माजली आहे. अनेक राजकारण्यांनी संताप व्यक्त केला असून काहींनी थेट सरकला दोष लावला आहे. आता साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर राष्ट्रीय महिला आयोगाचं पथकं मुंबईत दाखल झालं असून, महिला आयोगाच्या सदस्यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे.

महिला आयोगाच्या सदस्यांनी थेट ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. घडलेली घटना हि अत्यंत अमानवी आणि दुर्देवी आहे. मुंबईमध्ये गणपतीच्या आगमनाची तयारी सुरु असताना भररस्त्यात हि घटना घडते याचा अर्थ आरोपी अतिशय बिन्दास्त पणे वावरत आहेत, त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही आहे. आरोपींना कोणाचीही भय भीती राहिलेली नाही.

आरोपींच्या मनात जर शिक्षेबद्दल भीती असती तर हे अघोरी कृत्य त्या रात्री करण्याची त्याची हिम्मतच झाली नसती. मागील काही दिवसांपासून महिला अधिकाऱ्यांवर हल्ले, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात अनेक बलात्काराच्या घटना घडलेल्या कानावर आल्या आहेत. यामागे केवळ राज्य शासनाचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. कायदेव्यवस्था सरकारच्या नियंत्रणात नसल्यामुळेच अशा घटना घडल्या आहेत, असे महिला आयोगाच्या सदस्यांनी थेट म्हटले आहे.

त्याचप्रमाणे, संपूर्ण देशात प्रत्येक राज्यात राज्य महिला आयोग स्थापन आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासून राज्य महिला आयोगाची नेमणूकच करण्यात आलेली नाही, हि बाब अतिशय दुर्दैवी आहे. कोणतीही पीडित महिला अशा वेळी राज्य महिला आयोगाकडे मदतीसाठी धावते. इथे अशी कोणतीच संस्था नाही आहे, जिथे महिला आपली व्यथा मांडू शकतील. मला हे कळत नाही की सरकार महिलांबद्दल एवढ असंवेदनशील कसं काय बनलं आहे!  त्यांनी महिला आयोगाची स्थापना देखील केलेली नाही. जर ते असतं तर महिलांना नक्कीच न्याय मिळाला असता.

RELATED ARTICLES

Most Popular