29.2 C
Ratnagiri
Sunday, July 13, 2025

सावर्डेत मत्स्यपालन, कुक्कूटपालन, कृषी पर्यटनाची शेतीला जोड

वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला बाजारातील मागणीचा लाभ घेऊन...

चिपळुणात सदोष स्मार्ट मीटर बसवू नका…

स्थानिकांचा विरोध असतानाही अदानी पॉवर कंपनीने जुने...

चिपळूण घरकुलाचे स्वप्न जमीनदोस्त, तहसीलदारांकडे तक्रार

तालुक्यातील कादवड-सुतारवाडी येथील शासकीय योजनेतून मंजूर झालेल्या...
HomeMaharashtraगोव्यात जाण्यासाठी शिवशाहीने मुंबई ते पणजी प्रवास होणार शक्य

गोव्यात जाण्यासाठी शिवशाहीने मुंबई ते पणजी प्रवास होणार शक्य

या मार्गावरील मागणी लक्षात घेता एसटी महामंडळाने एसी शिवशाही सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

गोव्यात जाण्यासाठी आता एसटी महामंडळाकडून आणखी एक पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे एसटी महामंडळाची आरामदायी बस म्हणून ओळख निर्माण केलेल्या एसी शिवशाहीनेही मुंबई ते पणजी प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त एसटी महामंडळाकडून ही भेट देण्यात आली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली.

कोकणाला नयनरम्य निसर्गसौंदर्य लाभलं आहे. या सौंदर्यामुळे कोकणातील अनेक ठिकाणं पर्यटन केंद्र म्हणून विकसित झाली आहेत. येथील अनेक कुटुंबांचा चरितार्थ पर्यटनक्षेत्रावर अवलंबून आहे. कोकणातील या पर्यटनाला चालना देण्यासाठी आता अधिकची दळणवळण सुविधा गरजेची आहे. त्यामुळेच, नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येणाऱ्या मुंबईकरांना आरामदायी भेट देण्यात आली आहे.

नववर्षाला जेमतेम आठवडा शिल्लक राहिला आहे. वर्षाखेरीस शनिवार-रविवार आल्याने अनेकांनी घराबाहेर नववर्ष साजरे करण्याचे बेत आखले आहेत. यात कोकण-गोव्याला प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. यामुळे या मार्गावरील मागणी लक्षात घेता एसटी महामंडळाने एसी शिवशाही सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून एवढा लांब पल्ल्याचा प्रवास आरामदायी करता येईल.

मुंबई-गोवा मार्गावर गोवा राज्य परिवहन महामंडळाची ‘कदंब’ ही सेवा सुरू आहे. तिचे प्रतिप्रवासी भाडे एक हजार २५० इतके आहे. या मार्गावर धावणाऱ्या खासगी बसचे भाडे साधारण दीड हजार आहे. पुढील आठवड्यात खासगीचे भाडे दोन ते अडीच हजारांवर जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत प्रवाशांना एसटीच्या शिवशाहीचा आरामदायी पर्याय उपलब्ध होत आहे. याचे आरक्षण एसटीच्या आरक्षण कार्यालयांसह एमएसआरटीसी मोबाइल अॅपवरूनही करता येईल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular