24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeMaharashtraट्री वॉक संकल्पना, मुंबईत राबविण्याची योजना

ट्री वॉक संकल्पना, मुंबईत राबविण्याची योजना

मुंबईमध्ये लवकरच सिंगापूरच्या धर्तीवर ट्री वॉक हा प्रकल्प साकरला जाणार आहे.

मुंबईकरांना नेहमीच निसर्ग सहवासाची ओढ लागलेली असते. निसर्गाच्या सहवासात काही क्षण घालविण्यासाठी प्रत्येक विकेंड मुंबईकर सार्थकी लावतात. मुंबईमध्ये लवकरच सिंगापूरच्या धर्तीवर ट्री वॉक हा प्रकल्प साकरला जाणार आहे. हा ट्री वॉक म्हणजेच गर्द झाडींतून निघणाऱ्या वाटेवर चालताना नागरिकांना परम सुख देणारा अनुभव ठरणार आहे. प्रदूषणाचे दररोजचे वाढते निर्देशांक,  उंचच उंच इमारती, रोज सकाळ संध्याकाळ लोकलसाठी धावपळ या सगळ्यांमुळे मुंबईकरांची ही इच्छा ट्री वॉक या प्रकल्पाद्वारे पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

मुंबई महापालिकेतर्फे सिंगापूरच्या धर्तीवर मलबार हिल या नयनरम्य परिसरामध्ये ट्री वॉक उभारण्याची योजना आखण्यात येत आहे. मलबार टेकड्यांमधील कमला नेहरू उद्यानाजवळ हा प्रकल्प असेल. साधारण पुढील वर्षभरामध्ये हा प्रकल्प उभारण्यात येईल. या ट्री वॉकमध्ये पारदर्शक काचेचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना एक प्रकारे झाडांवरून चालण्याचा भास होईल. तसेच दर १५० मीटर अंतर चालल्यानंतर नागरिकांना बसण्याची सुविधा असेल. या मार्गावर सुरक्षेकरिता ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावले जातील.

गिरगाव चौपाटीवरून मलबार हिलवर अनेक लोक विकेंडला पायऱ्या चढून जातात. तर काही लोक रस्त्याद्वारे वाहनांनी तिथवर पोहोचतात. मात्र पायऱ्या चढून जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मुंबईकरांसह पर्यटकांचीही संख्या यामध्ये जास्त असते. याच ठिकाणी मुंबई महापालिका ट्री वॉक उभारणार आहे.

मुंबई महापालिका या प्रकल्पासाठी १२.६६ कोटी रुपये खर्च करेल, असा प्राथमिक अंदाज देण्यात आला आहे. मात्र हा प्रकल्प कमी वेळेत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन कंपनीने दिले आहे. टेकडीवर अशा प्रकारचा प्रकल्प उभारणे आणि काम पूर्ण करणे हे एक प्रकारचे आव्हानच असून, नैसर्गिक आपत्ती दरम्यान काही नुकसान झाल्यास पाच वर्षांपर्यंत दुरुस्तीची तरतूदही कंपनीने केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular