भारतातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या ई-मेल आयडीवर, निकाल लवकरात लवकर लागले नाहीत तर विद्यापीठ उध्वस्त करु अशी धमकी देण्यात आली आहे. मार्च २०२१ च्या परीक्षेच्या निकालाचे कामकाज सुरू आहे आणि अशा प्रकारची धमकी इमेल वरून आल्याबद्दल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशा दिवशी अनेक घातपाताचे प्रसंग घडवण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न असतो, त्यामुळेब भारतातील प्रमुख विद्यापीठातील एक समजल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाला पाठवण्यात आलेल्या मेलवरून धमकी प्रकरणी राज्यामध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. मुंबई विद्यापीठाच्या सभोवताली पोलिसांची कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
त्यामुळे पोलीस यंत्रणा आणि या इमेल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहे ईमेल नक्की कोणी पाठवला आहे त्यामागे काय उद्देश असू शकतो याचे कारण जाणण्याचे पोलीस प्रयत्न करत आहे. फक्त परीक्षांच्या निकालाबाबत धमकी आहे कि कोणत्या दहशतवादी संस्थेकडून ही धमकी देण्यात आली आहे, याबद्दल माहीती जमा करण्यात येत आहे.
ई-मेल द्वारे देण्यात आलेल्या धमकीमध्ये गुन्हेगाराने स्वतःची ओळख लपवून दोन ईमेलद्वारे विद्यापीठ उडवून देण्याची धमकी दिली आहे, तसेच त्या ई-मेलमध्ये बीए, बीकॉम, बीएस्सी यांचे निकाल वेळेस लागले नाहीतर बॉम्बस्फोटाची चित्रे पाठवून विद्यापीठ उडवून देऊ अशी चित्ररूपी धमकी दिली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून या धमकीनंतर मुंबई विद्यापीठ परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.