25.8 C
Ratnagiri
Saturday, September 6, 2025

एसटी प्रशासनाकडून लोकेशन अॅप’ची केवळ घोषणा

लालपरी'चे अचूक ठिकाण मोबाईलवर दिसेल, बस वेळेवर...

पीकविमा योजनेत खेड-दापोली आघाडीवर…

प्रधानमंत्री पीकविमा योजना यंदा नव्या स्वरूपात रत्नागिरी...

परतीचा प्रवास ठरला कोंडीचा… वाहनांच्या रांगा

गौरी-गणपती विसर्जनानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास बुधवारपासून सुरू...
HomeRatnagiriएका पाठोपाठ एक तीन खूनांची कबुली देणाऱ्या आरोपीचा 'सायली' बार सील

एका पाठोपाठ एक तीन खूनांची कबुली देणाऱ्या आरोपीचा ‘सायली’ बार सील

दुर्वास पाटील आणि त्याच्या सहकाऱ्यांवर तिन्ही खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

जयगडजवळील वाटद-खंडाळा येथील ‘सायली’ देशी बार उत्पादन शुल्क विभागाने सील केला आहे. एका पाठोपाठ एक असे ३ खून केल्याची कबुली पोलीस चौकशीत देणारा संशयीत आरोपी दुर्वास पाटील याच्या मालकीचा हा बार असून पोलीसांनी दिलेल्या अहवालानंतर गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तो सिल केला असल्याची माहिती संबंधित विभागाकडून पत्रकारांना देण्यात आली. रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील रहिवासी भक्ती जितेंद्र मयेकर (वय २३) हिचे दुर्वास दर्शन पाटील (वय २५, रा. जंगमवाडी, वाटद खंडाळा) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या संबंधातून भक्ती गरोदर राहिली आणि तिने दुर्वासकडे लग्नासाठी तगादा लावला अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे दुर्वासने तिला फोन करून खंडाळा येथे त्याच्या मालकीच्या ‘सायली देशी बार’ मध्ये बोलावले होते. संशयित आरोपी दुर्वास आणि त्याचा सहकारी विश्वास यांनी बारच्या वरच्या खोलीत भक्तीचा केबलने गळा आवळून खून केला.

त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपी सुशांत नरळकर याच्या वॅगनआर गाडीतून मृतदेह आंब्या घाटात नेण्यात आला आणि घाटाच्या निर्जन भागात फेकून देण्यात आला, असे पोलीस तपासात पुढे आले आहे. तसेच याच बारमध्ये २९ एप्रिल २०२४ रोजी दुर्वास पाटील आणि त्याच्या साथीदारांनी कळझोंडी येथील रहिवासी सीताराम लक्ष्मण वीर (वय ५५) यालाही जीवघेणी मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीनंतर सिताराम वीर यांचा मृत्यू ओढावला. या खून प्रकरणी जयगड पोलीस स्थानकात दुर्वास पाटील आणि त्याला मदत करणाऱ्या अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीताराम वीर यांना हाताने आणि काठीने बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर तिन्ही आरोपींनी वीर यांना चक्कर आल्याचे कारण सांगून रिक्षाने त्यांच्या घरी पाठवले. मात्र, घरी पोहोचल्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.

हे प्रकरण बाहेर येऊ नये यासाठी आरोपींनी इतर कामगारांनाही धमकी दिली होती अशी माहिती पोलीसांनी पत्रकारांना दिली. सायली बारमधील या घटनासंदर्भात पोलीस विभागानी राज्य उत्पादन शुल्क विभागाला अहवाल दिला होता. या अहवालानंतर उत्पादन शुल्क विभागाने हा बार सिल केला आहे. दरम्यान दुर्वास पाटील आणि त्याच्या सहकाऱ्यांवर तिन्ही खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular