25.6 C
Ratnagiri
Thursday, September 19, 2024

Redmi Note 14 मालिका 50MP OIS कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल…

कंपनीने अधिकृतपणे Redmi Note 14 सीरीजचा खुलासा...

आता कसोटी क्रिकेटचे नगारे, डिसेंबरपर्यंत दहा सामने

सातत्यपूर्ण व्हाइटबॉल क्रिकेट खेळल्यानंतर उद्यापासून भारताच्या कसोटी...

नेटवर्कअभावी लाडक्या बहिणी त्रस्त, ग्रामीण भागातील स्थिती

पुरवठा विभागाने घरगुती गॅस सिलिंडरसाठी मोबाईलवरील येणारा...
HomeKokanमुंबईतील तडीपार व्यापाऱ्याचा संगमेश्वरात खून, तिघांना अटक

मुंबईतील तडीपार व्यापाऱ्याचा संगमेश्वरात खून, तिघांना अटक

गुरांचा व्यापार की अंमली पदार्थ व्यवसाय याचीही चर्चा सुरु आहे.

मुंबईतून तडीपार करण्यात आलेल्या व्यापाऱ्याची संगमेश्वरात हत्या करण्यात आली असून एका रेल्वे बोगद्याजवळ मृतदेह सापडला आहे. दरम्यान पोलिसांनी या हत्येप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. संगमेश्वर पोलिसांनी त्याना न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. संगमेश्वर तालुक्यात मौजे आंबेड खुर्द या रेल्वे बोगद्याजवळ असलेल्या निर्जन परिसरात ५६ वर्षीय इसमाची हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हत्या झालेल्या इसमाचे नाव साजिद अन्सारी (वय ५६, रा. कुर्ला, तळेवाडी मुंबई) असं आहे. साजिद अन्सारी हा मुंबई परिसरातून तडीपार होता. त्याच्यावर यापूर्वी गुरांची वाहतूक करणे वगैरे आदी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, आर्थिक देवाण घेवाणीच्या कारणावरून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे. पण ही आर्थिक देवाण घेवाण व्यवहार कोणत्या धंद्यातील? अशी चर्चा सुरु आहे. गुरांचा व्यापार की अंमली पदार्थ व्यवसाय याचीही चर्चा सुरु आहे.

बुधवारची घटना – २५ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री पावणे दहा ते दि. २७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ७.४५ वाजेच्या दरम्यान संगमेश्वर तालुक्यात मौजे आंबेड खुर्द, तांबेवाडी, रिल्वे बोगदा क्र. २४ कडे जाणाऱ्या पाय वाटेवर निर्जनस्थळी हा धक्कादायक प्रकार घडला. या ठिकाणी मृतदेह दिसल्याने याची खबर तात्काळ संगमेश्वर पोलिसांना देण्यात आली.

अंदाज खरा ठरला – निर्जनस्थळी मिळालेला या मृतदेहाचा संशय पोलिसांना आला. ही आत्महत्या नसून खून झाल्याचा अंदाज पोलिसांना होता. तो अंदाज काही तासात खरा ठरला. तसेच जवळच एक मोबाईल पडलेला मिळाला. या मोबाईलवरून हा मृतदेह कोणाचा हे स्पष्ट झाले.

खून झाल्याचा अंदाज – निर्जनस्थळी मिळालेला या मृतदेहाचा संशय पोलिसांना आला. तसेच जवळच एक मोबाईल पडलेला मिळाला. या मोबाईलवरून हा मृतदेह कोणाचा हे स्पष्ट झाले. सुरुवातीला साजिद याने आत्महत्या केल्याचे भासवण्यात आले असले तरी हा झटपट असल्याचा अंदाज पोलिसांना होता. तो अंदाज खरा ठरला. साजिद आणि संशयित आरोपी हे एकमेकाचे. परिचयाचे होते. यातील संशयित आरोपी आणि इस्माईल यांच्याच आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन वाद झाला. झालेल्या वादातूनच ही हत्या झाली आहे. रेल्वे ट्रॅकजवळ पडलेल्या एका लोखंडी पाईपच्या साह्याने डोक्यावर मारहाण करून दुखापत करून साजिदची हत्या केली, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

कडाक्याचे भांडण ? – मुंबईत असलेला साजिद अन्सारी यांचा मुलगा आरबाज याच्याशी पोलिसांनी संपर्क साधला. यावेळी वडिलांची आदल्या दिवशी रात्री आर्थिक व्यवहारावरून वाद झाल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. तसेच वडील मुंबईला येणार होते. मात्र, ते न आल्याने त्यांचा शोध घरचे घेत होते. दरम्यान, वडील बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्याच्या तयारीत असतानाच वडिलांच्या मृत्यूची माहिती मुलगा आरबाज याला कळली.

पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल – या सगळ्या प्रकरणाची तक्रार आरबाज महमद साजिद अन्सारी (वय २४, रा. लाल बहादुर शास्त्री रोड, कुर्ला कोर्टाजवळ, कुर्ला (प), मुंबई) याने संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली आहे. मुंबई परिसरातून तडीपार असलेला साजिद याचे नातेवाईक संगमेश्वर देवरुख परिसरात असतात त्यांच्याकडे तो आला होता.

तीन संशयितांना ताब्यात घेतले – या खून प्रकरणी सागर संतोष म ोहिते, (वय २३), सनी संतोष मोहिते (वय २१) दोन्ही रा. संभाजीनगर ता. संगमेश्वर, अक्षय राजु साळवे (वय २५, रा. लोकमान्य नगर पाडा नं १ आकृती रेंटल रूम नं १६०२ वर्तकनगर बेस्ट ठाणे) या तिघांनाही संगमेश्वर पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गावित करत आहेत.

अंमली पदार्थाचा व्यवसाय ? – साजिद अन्सारी हा गुरांच्या व्यवसायाबरोबर गांजा आदी अंमली पदार्थचा व्यवसाय करीत असें अशी चर्चा संगमेश्वर परिसरात सुरु होती. आता हा खून नक्की कोणत्या व्यवसायाशी संबंधित आहे हे पोलीस तपासात निष्पन्न होईल.

सोमवारपर्यंत पोलीस कोठडी – भा. द. वि. कलम ३०२, ३४ अन्वये अटक केलेल्या संशयित आरोपींना देवरुख न्यायालयासमोर हजर केले असता तिन्ही आरोपींना सोम वार पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular