31.5 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

संगमेश्वरातील दिवट्या कुलदीपकाने वयोवृद्ध बापाला ‘सुरा’ दाखवून खंडणी मागितली

पैशासाठी अपहरण करण्याच्या घटना घडत असतानाच रत्नागिरी...

दांडगा वशीला असलेला कोकरे महाराज पोलीस कोठडीत !

या भगवान कोकरे नावाच्या महाराजाचा लोटे व...

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...
HomeMaharashtraस्व-संरक्षणासाठी हेल्मेट घालून चालवली एसटी

स्व-संरक्षणासाठी हेल्मेट घालून चालवली एसटी

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी बस कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे. विलीनीकरणाला पर्याय म्हणून राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना मूळ वेतनवाढ दिली, भत्ते वाढवले. तरी सुद्धा सरकारच्या या घोषणेनंतर काही कर्मचारी संघटना कामावर रूजू झाल्या. परंतु, काही संघटना अजूनही आपल्या मागणीवर आणि संपावर ठाम आहेत. काही ठिकाणी खाजगी वाहनांना सुद्धा बसस्थानकातून वाहतुकीला परवानगी देण्यात आली.

एसटी संपातून अनेक कर्मचार्यांनी माघार घेतली असून, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातून अनेक बस फेर्या सुरु करण्यात आल्या आहेत. शासनाने वेतनवाढ करून सुद्धा आवाहन करुनही एसटी कर्मचार्यांनी संप अजून सुरु ठेवलेला आहे, मात्र काही ठिकाणी एसटी कर्मचारी हजर झाल्याने एसटी गाड्या सुरू करण्याचा प्रशासनाने प्रयत्न सुरु केला आहे.

परंतु, संपावर ठाम असलेल्या संघटना मात्र बस वाहतूक सुरू करण्यास विरोध करीत आहेत यामुळे काही ठिकाणी बसवर दगडफेकी सारखेही प्रकार झाले. रत्नागिरी, लांजा, रायगड, मुंबई मधील काही ठिकाणी अज्ञात हल्लेखोराकडून चालत्या बसवर दगडफेक झाल्याच्या घटना मागील काही दिवसांमध्ये घडून आल्या आहेत.

यामध्ये विनाकारण चालक, वाहक आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. काहीवेळा शारीरिक नुकसानीला सुद्धा सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रत्येक वाहक चालकाने स्वत:चे रक्षण करून एसटी सेवा बजावायची असे ठरवले आहे.

अशा दगडफेकीच्या प्रकारांपासून वाचण्यासाठी अलिबाग आगारातील एका बस चालकाने चक्क हेल्मेट घालून बस चालवल्याचे दृश्य पाहायला मिळाले. मुरुडकडे एसटी बस घेऊन जाणाऱ्या चालकाने सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट परिधान करत बस चालवत नेली त्यांच्या या अनोख्या युक्तीबद्दल सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहेत. दुचाकी चालवताना हेल्मेट सक्तीचे आहे, पण आता ते स्व-संरक्षणासाठी परिधान करावे लागत आहे आणि ते सुद्धा एसटी चालवताना. वाचून मजेशीर वाटले तरी स्व-संरक्षण महत्वाचे आहे.

RELATED ARTICLES

Most Popular