28.3 C
Ratnagiri
Wednesday, October 9, 2024

ना. उदय सामंतांचा रत्नागिरी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी केला अभूतपूर्व सत्कार

रत्नागिरीचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे उद्योगमंत्री ना. उदय...

चिपळुणात शेतकऱ्यांचे १८०० अर्ज झाले बाद

पीएम किसान व नमो सन्मान योजनेच्या नवीन...
HomeSindhudurgकुणाच्या कामाबाबत मला शंका नाही माझा विजय निश्चित : नारायण राणे

कुणाच्या कामाबाबत मला शंका नाही माझा विजय निश्चित : नारायण राणे

कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये महायुतीचीही बैठक संपन्न झाली.

लोकसभा निवडणुकीच्या माझ्या प्रचारासाठी तिन्ही पक्षाचे सर्व मान्यवर नेते मंडळी पदाधिकारी तसेच आमचे पालकमंत्री यांनी माझ्यासाठी जे परिश्रम घेतले मेहनत घेतली त्याबद्दल मी तुमचा अतिशय आभारी आहे मला अभिप्रेत काम झाले माझी कोणतीही तक्रार नाही. अशी कृतज्ञता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शनिवारी कुडाळ येथे झालेल्या बैठकीत व्यक्त केली. रत्नागिरी येथील मतमोजणीनंतर आपल्या विजयाच्या आनंदोत्सवात सामील व्हा असे आवाहनही त्यांनी केल महायुतीच्या कार्यकर्त्यांचे बळ फार मोठे आहे. कोकण पदवीधर निवडणुकीसह पुढच्या सर्व निवडणुका महायुतीतून लढवू व महायुतीची निष्ठा व महायुतीचे ऐक्य कायम ठेवू अशी अपेक्षा व्यक्त केली.

भाजपच्या जिल्हा कार्यकारणी, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महायुतीच्या बैठकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मतमोजणीनंतरचा महायुतीचा विजयोत्सव व २६ जून रोजी होत असलेली कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी भाजप नेते आमदार नितेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी अतुल काळसेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय आंग्रे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिदनाईक व अशोक दळवी, सुरेश गवस, श्वेता कोरगावकर आदी महायुतीचे पदाधिकारी व्यासपीठाव्र होते.

कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये महायुतीचीही बैठक संपन्न झाली. मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. नारायण राणे म्हणाले की, पदवीधर निवडणुकीत विजयी होण्यासाठी आपण सर्व सज्ज आहोत. लोकसभेत महायुती कडून उमेदवारी दिली. सर्वानी चांगलं काम केले. त्यामुळे ४ जुन्या मतमोजणी सुरू होईल त्यावेळी आपण सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती करतो. आपण मेहनत केली म्हणून विजय निश्चित आहे. आता पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. एका बाजूला हा विजय घेणार त्यामुळे दुसऱ्या बाजूला पदवीधर उमेदवार जोशात विजयी होईल. पदवीधरची निवडणूक वेगळी आहे. आपल्या तिन्ही पक्षाची कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे त्यामुळे आपला विजय निश्चित आहे.

केद्रांत व राज्यात सत्ता आपली आहे त्यामुळे विजय आपलाच आहे. आमचा विश्वास पक्षाचा विश्वास सार्थकी कराल असा आम्हाला विश्वास आहे. दहावी, बारावीच्या गुणांप्रमाणे आपले कार्यकर्ते अव्वल आहेत हे सिध्द करा. सर्वानी सलोख्याने काम करावे, ही युती अखंड राहावी असं आपलं मत आहे, आपले हे ऐक्य असंच कायम ठेवा असे आवाहन केले. भाजपने मला या लोकसभा निवडणुकीत. उमेदवारी दिली व महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. पालकमंत्री व राज्याचे जेष्ठ मंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक उद्योग मंत्री उदय सामंत आधी सर्वांनी काम केले त्याबद्दल मी आभारी आहे. असेही नारायण राणे म्हणाले. पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले कोकण पदवीधरमध्ये पाच जिल्ह्यांत मतदार आहेत.

हा मोठा मतदार संघ आहे. या आमदाराला ३९ मतदार संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळते. शिक्षक आणि पदवीधरमध्ये वरच्या स्थानी या आमदारांना स्थान दिले जाते. या मतदारसंघात २ लाख ३० हजार मतांची नोंदणी होणे अपेक्षित आहे. नोंदवलेलं मतदान शोधून काढणे ही आपली परिक्षा आहे. निवडणूक गंभीरपणे घ्या. ठिकठिकाणी मतदारांचे मेळावे घेऊन मतदान कसं करावं हे सांगणं आवश्यक आहे. आपल्या निरंजन डावखरे यांना सिंगल लाईन करून मतदान करणे आवश्यक आहे. आपल्याला जिंकायचं आहे त्यासाठी न चुकता मतदान केले पाहिजे. कार्यकत्यांनी मतदारांना वाटून घ्या व मतदारांना बाहेर काढा. लोकसभेत आपण यशस्वी होणार हे निश्चित आहे. सर्वानी आपला आनंदोत्सव साजरां करण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहा असे आवाहन केले.

कोकण पदवीधर निवडणूकीला विशेष महत्त्व आहे. पालघर पासून सिंधुदुर्गपर्यंत पाच जिल्ह्यांचा यात सम ावेश आहे. एकूण ३९ आमदारांच्या कार्यक्षेत्रातील ही निवडणूक आहे. दोन लाख तीस हजार मतदार आहेत. कोकण पदवीधर विधान परिषद सदस्याला विशेष मान असतो. या आमदारांना वरचे स्थान असते. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची असून निरंजन डावखरे हे महायुतीचे उमेदवार म्हणून सर्वांनी काम करा असे आवाहनही त्यांनी केले. सूत्रसंचालन रणजित देसाई यांनी केले. यावेळी दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवित कुडाळ तालुक्यात प्रथम आलेल्या बॅ. नाथ पैची सौजन्या घाटकर हिचा सत्कार केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.

RELATED ARTICLES

Most Popular