28.7 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriअखेर “या“ रेल्वेला मिळाला संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर थांबा

अखेर “या“ रेल्वेला मिळाला संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर थांबा

गणपती नंतर ही गाडी कायम करणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर संगमेश्वर रोड स्थानकाचा थांबा मात्र रद्द करण्यात आला.

गणपती उत्सवाच्या काळात नागपूर-मडगाव-नागपूर ही विशेष साप्ताहिक गाडी सुरू झाली त्यावेळी संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन थांबा होता. आणि गणपती नंतर ही गाडी कायम करणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर संगमेश्वर रोड स्थानकाचा थांबा मात्र रद्द करण्यात आला. त्यामुळे एक प्रकारे संपूर्ण संगमेश्वर तालुक्यावर अन्याय करण्यात आला. ह्या अन्यायाला वाचा फोडण्याची लढाई सुरू करण्यात आली ती ‘निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर’ या फेसबुक ग्रुपचे पत्रकार संदेश जिमन आणि त्यांचे सहकारी ह्यांनी ह्या अन्यायाची दखल घेत कोकण रेल्वेच्या विविध विभागांशी पत्र व्यवहार करून हा प्रश्न उच्च स्तरावर मांडला.

अगदी कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्यालयात सीएमडी संजय गुप्ता यांना त्या संदर्भातील पत्र व्यवहार केला. तसेच विभागीय आमदार श्री. शेखरजी निकम यांच्याशी ही यासंदर्भात चर्चा केली. ह्या सर्व प्रयत्नांना यश येऊन कोकण रेल्वेने अखेर नवीन अध्यादेश काढले आहेत. त्यानुसार नोव्हेंबरपासून नागपूर-मडगाव-नागपूर ह्या द्वि-साप्ताहिक गाडीला संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. तरी सर्व संगमेश्वरवासीय प्रवाशांनी या साप्ताहिक गाडीचे जास्तीत जास्त आरक्षण करून त्याचा लाभ घ्यावा. जेणे करून मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन थांबा कायमस्वरुपी ठेवता येईल.

अखेर केलेल्या प्रयत्नांना यश मिळाल्यामुळे ह्या आनंदाची बातमीने संगमेश्वरच्या विविध स्तरांतून निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर’ या फेसबुक ग्रुपचे सर्व सदस्य आणि ग्रुप चे प्रमुख पत्रकार संदेश जिमन त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular