27.9 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

कुंभार्ली घाटाचे सोनपात्र घाट असे नामांतर करण्याची सकल धनगर समाजाची मागणी

सोनबा धनगर बांधवाची आठवण सदैव टिकवून ठेवण्यासाठी...

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...
HomeRatnagiriनाखरे येथील विवाहितेची आत्महत्या, कारण गुलदस्त्यात

नाखरे येथील विवाहितेची आत्महत्या, कारण गुलदस्त्यात

मंगळवारी सकाळी प्रेरणा कोरपे हिच्या शेजार्‍यांनी दत्‍तारामला फोन करुन त्याच्या बहिणीने राहत्या घरी गळफास घेतल्याची माहिती दिली.

रत्नागिरी तालुक्यातील नाखरे येथे विवाहितेने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवार दि. ५ जुलै रोजी घडली आहे. आत्महत्तेच कारण अद्याप स्पष्ट झाले नाही आहे. हल्ली नात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वेबनाब होत असलेले कानावर येत आहेत. परंतु, या महिलेने एवढे टोकाचे पाउल का उचलले याबाबत पतीपासून सर्वांमध्येच संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे.

प्रेरणा प्रताप कोरपे वय ३७,  रा. नाखरे, रत्नागिरी असे गळफास घेतलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत तिचा भाऊ दत्‍ताराम देउ जोशी यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानूसार, मंगळवारी सकाळी प्रेरणा कोरपे हिच्या शेजार्‍यांनी दत्‍तारामला फोन करुन त्याच्या बहिणीने राहत्या घरी गळफास घेतल्याची माहिती दिली.

प्रेरणाचे पती प्रताप कोरपे मंगळवारी पहाटे ५ वा. नोकरीवर निघून गेले होता. त्यानंतर सकाळी ९ वा. सुमारास शेजार्‍यांना प्रेरणा घराच्या ओटीवर नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यामुळे त्याबाबत भाऊ दत्‍तारामने याबाबत पूर्णगड पोलिसांना माहिती देताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन, उत्‍तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवण्यात आला. अधिक तपास पोलिस हेड काँस्टेबल संदेश चव्हाण करत आहेत.

शुल्लक कारणावरून अबोला, भांडण, वाद होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यामुळे काही वेळेला वादाचे रुपांतर एकदम भयंकर होऊन काहीजण अति टोकाचे पाऊल उचलताना दिसतात. पण त्यामुळे स्वत: जीव तर जातोच परन्तु, अख्खा कुटुंब उध्वस्त झालेले दिसून येते.

RELATED ARTICLES

Most Popular