20.7 C
Ratnagiri
Wednesday, January 28, 2026

जिल्ह्यात गुप्त बैठकांचा जोरात धडाका उमेदवारांची पडताळणी, रणनीतीला वेग

जिल्ह्यात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होताच...

अपघाती जखमींना ‘कॅशलेस’ उपचार, मदतीसाठी धावणाऱ्यांनाही २५ हजार !

रस्ते अपघातानंतर जखमींच्या जीवितासाठी अत्यंत निर्णायक ठरणाऱ्या...

अर्ज भरले; आता माघार घेण्यासाठी नेत्यांची मोर्चे बांधणी

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर...
HomeMaharashtraज्याची बायको पळून जाते, त्याचे नाव मोदी ठरते, नाना पटोलेंचे पुन्हा आक्षेपार्ह...

ज्याची बायको पळून जाते, त्याचे नाव मोदी ठरते, नाना पटोलेंचे पुन्हा आक्षेपार्ह वक्तव्य

भाजपचे आमदार आणि राज्याचे माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याविरोधात 'जोडे मारो' आंदोलन केलं.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सुरु असलेली वादग्रस्त वक्तव्याची मालिका अजूनही सुरुच आहे. भाजपकडून राज्यभरात मी मोदीला मारु शकतो, शिव्या देऊ शकतो’, या नानांच्या वक्तव्यानंतर आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावर त्यांनी सारवासारव करून मी गावगुंड आहे त्याला मोदी म्हणालो, पंतप्रधानांना नाही. त्यानंतर त्यांच्या गावातील गुंड मोदी हजार झाला आणि त्याने सांगितले कि, माझी बायको मला सोडून गेली म्हणून मला मोदी म्हणून चिडवतात.

त्यानंतर आता पुन्हा एकदा नाना पटोले यांनी मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं असून, भाजप पक्षातील कार्यकर्त्यांना ते नाहक भडकवायचे काम करत आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा भाजप नेते आक्रमक झाले आहे. नाना पटोले यांनी रविवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “ज्याची बायको पळून जाते, त्याचे नाव मोदी ठरते,” असं आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर भाजप नेते पुन्हा एकदा संतप्त झाले आहेत.

भाजपचे आमदार आणि राज्याचे माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन केलं. त्यांच्या विरोधात तातडीने कारवाई न झाल्यास राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांकडून पुन्हा एकदा तीव्र निषेध आंदोलनं करण्यात येणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी विविध प्रकारे विरोध नोंदविला गेला.

रत्नागिरीतील गुहागरमध्ये देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी महिन्याभराच्या कालावधीत दोन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अपमानजनक उद्‌गार काढले, त्याचा निषेध म्हणून गुहागर भाजपने सोमवारी नाना पटोलेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. गुहागर बाजारपेठ नाका येथे हा पुतळा दहन करताना भाजप कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गुहागर भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगातील क्रमांक १ चे लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून जाहीर करण्यात आले. अशा नेत्याविरुध्द सातत्याने अपमानास्पद भाषेत बोलण्याचे काम पटोले करत आहेत. याचा आम्ही तीव्र निषेध करतो.

RELATED ARTICLES

Most Popular