28.8 C
Ratnagiri
Saturday, November 22, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeSindhudurgराणे पिता पुत्रांना दिशा सालियन वक्तव्य भोवणार ! गुन्हा दाखल

राणे पिता पुत्रांना दिशा सालियन वक्तव्य भोवणार ! गुन्हा दाखल

सालियनच्या पालकांनी देखील केवळ राजकीय स्वार्थासाठी आमच्या मुलीची नाहक बदनामी केली जात आहे असा आरोप करत महिला आयोगाकडे तक्रार केली होती.

नारायण राणेंनी दिशा सालियन बद्दल केलेले वक्तव्य त्यांना चांगलच भोवलं आहे. या प्रकरणात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र लिहून भाजप नेते नारायण राणे असंवेदनशील राजकारण करून दिशा सालियन यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी करत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.

तसेच महापौर किशोरी पेडणेकर आणि राज्य महिला आयोगाच्या काही सदस्यानी दिशा सालियनच्या कुटुंबीयांची भेट प्रत्यक्षरित्या तिच्या घरी जाऊन घेतली. त्यावेळी सालियनच्या पालकांनी देखील केवळ राजकीय स्वार्थासाठी आमच्या मुलीची नाहक बदनामी केली जात आहे असा आरोप करत महिला आयोगाकडे तक्रार केली होती.

पोलिसांनी महिला आयोगाला रिपोर्ट सादर झाल्यानंतर रात्री १२ वाजता मालवणी पोलीस ठाण्यात केंद्रीय मंत्र्यांबद्द्ल गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या अहवालात दिशा सालियनच्या पोस्टमॉर्टममध्ये तिच्यावर कोणत्याही प्रकारे लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच ती गरोदर देखील नव्हती असेही स्पष्ट करण्यात आले आहे. पोलिसांनी महिला आयोगाला यासंदर्भात अहवाल दिला आहे.

दिशा सलियन यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने मालवणी पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण राणे हे वारंवार दिशा सालियन यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य करत असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. दिशाबद्दल समाज माध्यमावर चुकीची व बदनामीकारक माहिती देत अनेक प्रकारे चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे. याबद्दल नारायण राणे यांच्या असंवेदनशील वागण्याविरुद्ध तसेच त्यांनी केलेल्या आरोपांना माध्यमांवरून दुजोरा देणारे नितेश राणे व चंद्रकांत पाटील यांच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करा असे निर्देश महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular