26.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeMaharashtraनारायण राणेंची केंद्रात वर्णी

नारायण राणेंची केंद्रात वर्णी

सिंधुदुर्गचा ढाण्या वाघ म्हणून ज्यांची ख्याती आहे, असे मान. नारायण राणे यांना केंद्रात लघु आणि मध्यम उद्योग खात्याचे  मंत्रीपद मिळाल्याने रत्नागिरी जिल्ह्यासह सगळीकडे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री म्हणून नारायण राणे यांच्या नावाची वर्णी लागल्यावर सगळीकडे जोशाचे वातावरण निर्माण झाले.

जिल्हा भा.ज.पा. अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी नारायण राणेंना मिळालेल्या मंत्री पदाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि, संपूर्ण महाराष्ट्रात राणेसाहेब यांच्या बद्दल आदराची भावना असून, त्यांच्या केंद्रीय मंत्रीपदी झालेल्या निवडीबद्दल सर्व कार्यकर्त्यां मध्ये एक प्रकारचे चैतन्य निर्माण झाले आहे. केंद्रीयमंत्री म्हणून विराजमान होत असल्याचा आनंद नक्कीच अवर्णनीय आहे.

रत्नागिरीतील भा.ज.पाचे सर्व कार्यकर्ते राणेसाहेबांना केंद्रात मंत्रीपद मिळाल्याने अतिशय आनंदी झाले आहेत. राणेसाहेबांचे मंत्रीपदामुळे रत्नागिरी भा.ज.पा. संघटनेची ताकद लक्षणीय वाढलेली दिसणार आहे. राणेसाहेबांच नेतृत्व हे विकासभिमुख, कणखर, अभ्यासू आणि तेवढेच आक्रमक नेतृत्व असल्याने,  रत्नागिरी विकासासाठीच्या गरजेच्या योजना,  अनेक उद्योगधंदे रत्नागिरीमध्ये येतील. कोकणच्या विकासामध्ये आत्ता चार चांद लागण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असा ठाम विश्वास ॲड. पटवर्धन यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपती भवनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात सायंकाळी ६ वाजता ४३ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. हा शपथविधी अनेक कार्यकर्ते ऑनलाईन बघत होते. ४३ मंत्र्यांच्या यादीमध्ये नारायण राणे यांचे नाव प्रथम क्रमांकावर असल्याने पहिली शपथ त्यांनी घेतली. त्यामध्ये त्यांनी शपथविधीला “मै नारायण तातू राणे, ईश्वर की शपथ लेता हूँ की…” असे म्हणत भाजप नेते नारायण राणेनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. आणि सर्वत्र एकच जल्लोषाचे वातावरण पसरले. राणेसाहेबांचे केंद्रीयमंत्री म्हणून रत्न नगरीमध्ये उत्साहपूर्वक स्वागत करण्यासाठी रत्नागिरी भा.ज.पा. आतुर झाली आहे. नारायण राणेसाहेबांचे पुढील विकसनशील वाटचालीसाठी शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular