26.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriकेंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या दौऱ्याची रूपरेषा

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या दौऱ्याची रूपरेषा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेमध्ये झालेल्या गोंधळामुळे, ती तूर्तास स्थगीत करून दोन दिवस विश्रांती घेऊन नारायण राणे पुन्हा यात्रेसाठी तयार झाले आहेत. उदया २७ ऑगस्ट पासून रत्नागिरीहून दौऱ्याला सुरुवात केली जाणार असून, त्यांच्या दौऱ्याची रूपरेषा काहीशी खालील प्रकारे आहे.

नारायण राणे उद्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून ते आपली जनआशीर्वाद यात्रा रत्नागिरीतून पुन्हा सुरू करणार आहेत. नारायण राणे यांच्या केंद्रीय मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतरच्या पहिल्यांदाच रत्नागिरीमध्ये होणाऱ्या आगमनामुळे, भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पहायला मिळत आहे.

राणे सकाळी जुहू विमानतळावरून मार्गस्थ होऊन, सकाळी रत्नागिरी विमानतळावर आगमन होणार आहे. सकाळी दहा वाजता ते रत्नागिरी मारुती मंदिर येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला हार अर्पण करून त्यांच्या पुढील कार्यक्रमासाठी मार्गस्थ होतील. सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ते रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये सक्रीय आहेत.

या राणेंच्या दौऱ्यामध्ये अनेक विविधांगी कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे. त्यामध्ये आंबा उत्पादकांशी चर्चा आणि सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे लांजा आणि राजापूर येथे कार्यकर्त्यांची भेट घेण्यात येणार असून, सत्कार समारंभ आयोजन केले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या दौऱ्यामुळे भाजप व त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये भलताच उत्साह संचारला आहे. त्यांच्या स्वागतासाठी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी जोरदार मेहनत घेत आहेत. विविध प्रतिनिधी मंडळांच्या भेटी, कुवारबाव येथील भाजपा कार्यालयाला भेट आणि पत्रकार परिषद घेऊन पुढील दिवसाच्या यात्रेसाठी ते सिंधुदुर्गकडे रवाना होणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular