27.2 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

गुकेश – कार्लसनमध्ये विजेतेपदासाठी चुरस – नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा

बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या विभागात अखेरच्या फेरीपर्यंत कमालीची...

रत्नागिरीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तरूणाला पकडले…

पांढरा समुद्र परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला...

उध्दव ठाकरेंचे मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत…

गेल्या दीड महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे...
HomeMaharashtraदिशा सालियन बदनामी प्रकरण, राणे पिता पुत्राला दिलासा

दिशा सालियन बदनामी प्रकरण, राणे पिता पुत्राला दिलासा

या राजकारणामुळे आमच्या मृत मुलीच्या आत्म्याला शांती तरी कशी मिळेल? उगाच पुन्हा सगळं प्रकरण बाहेर काढून  उगाळण्यात येत आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांना दिशा सालियनबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी न्यायालयाने दिलासा दिला आहे. दिशा सालियनच्या मृत्यूनंतर सुरू असलेल्या राजकारणावरून तिच्या पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. दिशा सालियन हिच्यावर बलात्कार होत असताना फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक होते, असा सवाल उपस्थित करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या प्रकरणाला नव्याने वाचा फोडली होती. दिशावर कोणत्याही प्रकारे अत्याचार झालेले नाहीत, बलात्कार करून तिची हत्या केल्याचे आरोप धादांत खोटे आहेत. मात्र, आता मृत्यूनंतरही राजकारण करून तिची बदनामी करत आहेत. तुमच्या या राजकारणामुळे आम्ही व्यथित झालो आहोत. या लोकांमुळे आम्हाला जगायची इच्छा उरलेली नाही. आम्हीही आता जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेऊ. आणि त्यासाठी तुम्हीच जबाबदार असाल,  असे दिशा सालियन हिच्या आईने सांगितले.

दिशाच्या मृत्यूनंतर माध्यमांच्या ससेमिरा मागे लागत असल्याने आम्ही घराबाहेर देखील पडत नव्हतो. मात्र, आता पुन्हा या प्रकरणावरून घाणेरडे राजकारण करायला सुरुवात झाली आहे. या राजकारणामुळे आमच्या मृत मुलीच्या आत्म्याला शांती तरी कशी मिळेल? उगाच पुन्हा सगळं प्रकरण बाहेर काढून  उगाळण्यात येत आहे. कृपया आम्हाला आता शांततेने जगू द्या,  असे दिशाच्या आईने म्हटले आहे. या सगळ्या प्रकरणा विरोधात दिशाच्या पालकांनी महिला आयोगाकडे तक्रार नोंदवली. आमची मुलगी आमच्यात नाही आहे,  पण तुम्हाला आमचं दु:ख कळत नाही का ! असा सवाल दिशाच्या आईने केला होता.

दिंडोशीतील सत्र न्यायालयाने राणे पिता-पुत्राला दिशा सालियन प्रकरणात अटी, शर्तींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यानंतर आमदार नितेश राणेनी पहिली प्रतिक्रिया देत म्हटले की, ”केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मला दिशा सालियन प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. अटी, शर्तींसह हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.” जामीन मंजूर केल्याने त्यांनी न्यायालयाचे आभार मानत म्हटले आहे की, कोणावर ही अन्याय होत असले तर त्याविरुद्ध आवाज उठवण्याचा अधिकार अबाधित ठेवण्याचे काम आज न्यायालयाने केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular