26.9 C
Ratnagiri
Wednesday, July 17, 2024

रत्नागिरी मिरकरवाडा मच्छीमार्केटची दुरवस्था

शहराजवळील मिरकरवाडा येथील मच्छीमार्केटची अवस्था दयनीय झाली...

घनकचरा प्रकल्पाला ५ एकर जागा – उदय सामंत

रत्नागिरी पालिकेचा घनकचरा प्रकल्पाच्या जागेचा प्रश्न अखेर...

परशुरामनगर भागात पुराची नवी समस्या, महामार्ग विभागाचे दुर्लक्ष

ओझरवाडी डोंगरातील पावसाचे पाणी महामार्गच्या गटारांमध्ये न...
HomeRatnagiriसक्षम कार्यकर्त्यांमुळेच नारायण राणे विजयी - बाळासाहेब माने

सक्षम कार्यकर्त्यांमुळेच नारायण राणे विजयी – बाळासाहेब माने

सर्व कार्यकर्त्यांचे भाजप कुटुंब म्हणून अभिनंदन करणे आवश्यक होते.

लोकसभा निवडणुकीत भाजप नेते, खासदार नारायण राणे महायुतीच्या माध्यमातून झालेला विजय नेत्रदीपक आणि ऐतिहासिक आहे. तब्बल ४५ वर्षे कमळ चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवाराला मतदान करण्याची इच्छा असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातील मतदारांची मनोकामना राणे यांच्या माध्यमातून पूर्ण झाली. मागील दोन निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदींसाठी मतदान झाले खरे; पण उमेदवार भाजपचा नसल्याची सल मनात असल्याने कार्यकर्त्यांनी तन-मन-धन अर्पून काम केल्यानेच हा विजय प्राप्त झाला, असे प्रतिपादन भाजपचे नेते बाळासाहेब माने यांनी केले.

रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभेतील सर्व कार्यकर्त्यांचे भाजप कुटुंब म्हणून अभिनंदन करणे आवश्यक होते. याकरिता जयेश मंगल पार्क येथे शुक्रवारी रात्री झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या स्नेहमेळाव्यात माने बोलत होते. या वेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, आमदार अॅड. निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत प्रमुख उपस्थित होते. सध्या कोकण पदवीधर मतदार संघात निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. नारायण राणे विजयी झाल्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. या निवडणुकीत ही ताकद दिसून येईल तसेच आगामी काळात महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आहेत.

नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. यात भाजपचे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. मेळाव्याला भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, जि. प. रत्नागिरीचे माजी उपाध्यक्ष सतीश शेवडे, ज्येष्ठ पदाधिकारी अॅड. बाबासाहेब परूळेकर, माजी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, अॅड. विलास पाटणे, अॅड. भाऊ शेट्ये, अशोक मयेकर, सचिन वहाळकर, युवा नेते मिहिर माने आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular