27.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeMaharashtraनारायण राणेंना अजून एक धक्का, मालवणमधील बंगल्यावर सुद्धा कारवाईचे आदेश

नारायण राणेंना अजून एक धक्का, मालवणमधील बंगल्यावर सुद्धा कारवाईचे आदेश

दुसरी धक्कादायक बातमी म्हणजे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण चिवला बीच वरील निल रत्न या बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश आले असल्याचे वृत्त समोर आले आहे.

शिवेसना आणि नारायण राणे यांच्यातील उभा वाद पुन्हा ज्वलंत व्हायला सुरुवात झाली. राणेंनी घेतलेल्या  पत्रकार परिषदेला शिवसेनेकडून खास. विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्यूत्तर दिलं आहे. यादरम्यान मुंबई महापालिकेने नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याची पाहणी करण्यासाठी नोटीस दिली. आणि आता दुसरी धक्कादायक बातमी म्हणजे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण चिवला बीच वरील निल रत्न या बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश आले असल्याचे वृत्त समोर आले आहे.

जुहू स्थित अधिश बंगल्याची पाहणी करण्यासाठी मुंबई महापालिकेचे अधिकारी राणेंच्या घरी पोहोचले देखील होते, परंतु, घरात कोणी जबाबदार व्यक्ती उपस्थित नसल्यानं ते पाहणी न करता निघून गेले. यानंतर पुन्हा एकदा नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर हल्ला चढवला होता. याला उत्तर देण्यासाठी पुन्हा शिवसेनेनं मुंबईतील अविघ्न इमारती संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले.

आता प्रत्युत्तरादाखल शिवसेनेनं घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण चिवला बीचवर नील रत्न बंगल्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले होते आणि त्याच बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारत सरकारच्या एका संस्थेकडून महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणाला अधिकार देण्यात आले आहेत. त्यावर शिवसेनाला प्रत्युत्तर दिले कि, लगेच ईडी नाहीतर बंगल्यांवर कारवाई होते असे दिसून येत आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण चिवला बीच वरील निल रत्न या बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणाला आदेश दिले आहेत. नारायण राणेंच्या अधीश बंगल्याच्या पाहणीचा वाद सुरु असतानाच निलरत्न बंगल्यावर देखील कारवाईचे आदेश देण्यात आल्याने आता खुद्द नारायण राणे याबद्दल काय भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular