26.8 C
Ratnagiri
Wednesday, November 6, 2024

Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रिक बाईक समोर आली आहे

रॉयल एनफिल्डने इटलीतील मिलान येथे सुरू असलेल्या...

‘रामायण’मध्ये रणबीर कपूर करणार डबल धमाका…

रणबीर कपूर आणि सई पल्लवी स्टारर 'रामायण'...

नीलेश राणेंकडून जैतापकरांची समजूत, थेट हेलिकॉप्टरने धाडले गुहागरात

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना...
HomeRatnagiriरत्नागिरीत अमली पदार्थ जप्त, दोघांना अटक

रत्नागिरीत अमली पदार्थ जप्त, दोघांना अटक

एकूण ४ लाख ४३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलातर्फे दुपारच्या गस्तीदरम्यान शहरातील मुरुगवाडा येथे अमली पदार्थाविरुद्ध मोठी कारवाई केली. मुरुगवाडा-पांढरा समुद्रकिनारी ब्राऊन शुगर आणि गांजा बाळगलेल्या दोघांवर शहर पोलिसांच्या डीबी (डीटेक्शन बॅण्च) पथकाने कारवाई केली. संशयितांकडून ४ लाख ४३ हजार २०० रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. शहर पोलिस ठाण्यात दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. करमजित सिंह जरनैलसिंह (वय २६, रा. गंगानगर, ता. निघासन, लखिमपुरखिरी, रा. उत्तर प्रदेश, सध्या राहणार मुरुगवाडा, रत्नागिरी) व मोहनसिंह रामचंद्र भाट (२५, रा. भागेश्वर रुपाल जि. डडेल्धरा देश-नेपाळ, सध्या राहणार मुरुगवाडा) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना काल (ता. २८) दुपारी साडेतीनच्या सुमारास पांढरा समुद्र, मुरुगवाडा येथील पाण्याच्या टाकीजवळ घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी शहरातील मुरुगवाडा पांढरा समुद्र येथे पोलिस पथक गस्त घालत होते. तेथे असलेल्या दोघा तरुणांच्या हालचालींवरून संशय आला. त्या दोघांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले.

 त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी करमजित सिंह व मोहनसिंह भाट, असे सांगून मूळ उत्तरप्रदेश व नेपाळचे असल्याचे सांगितले. पोलिसपथकाने त्यांची कसून तपासणी केली असता त्यांच्याकडे ४ लाख चारशे रुपयांचा १८२ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन व ५२.५ ग्रॅमचा १ हजार ५० रुपयांचा गांजा, २ हजार ८०० रुपयांची रोख रक्कम, १३ हजारांचा मोबाईल, दुसरा २५ हजारांचा मोबाईल, ३०० रुपयांचा एक रॉकलाईट कंपनीचा इलेक्ट्रिक वजनकाटा, २५० रुपये किमतीची टारगेटरी लॉकएलडी बॅग, ४०० रुपयांची सॅक असा एकूण ४ लाख ४३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, दोघा संशयितांना अमली पदार्थ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पोलिस उपनिरीक्षक श्याम आरमाळकर, सहायक पोलिस फौजदार दीपक साळवी, पोलिस हवालदार अमोल भोसले, अरुण चाळके, राहुल जाधव, पंकज पडेलकर, आशिष भालेकर, पोलिस नाईक भालचंद्र मयेकर, पोलिस शिपाई अमित पालवे व कौस्तुभ जाधव यानी ही कारवाई केली.

RELATED ARTICLES

Most Popular