31.5 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

दांडगा वशीला असलेला कोकरे महाराज पोलीस कोठडीत !

या भगवान कोकरे नावाच्या महाराजाचा लोटे व...

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...
HomeMaharashtraजगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानातर्फे महाडमध्ये फिरते दवाखाने

जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानातर्फे महाडमध्ये फिरते दवाखाने

रत्नागिरीतील जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थान कोणत्याही मदतीसाठी प्रथम पुढे सरसावण्यासाठी प्रचलित आहे. गुरूंच्या एका हाकेला किती महत्व आहे हे या सर्व भक्तांनी सिद्ध केले आहे. २२ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकण विभागाची दैना उडाली होती. सर्वत्र नद्यांनी पाण्याची पातळी ओलांडल्याने, सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी डोंगरच्या डोंगर खाली येऊन त्याखाली अनेक संसार, कुटुंबे गाडली गेलीत.

महाड मधील तळये गावी झालेल्या दुर्घटनेमध्ये अख्खा डोंगरच ढासळल्याने संपूर्ण गाव त्याखाली गाडला गेला. एका क्षणामध्ये होत्याचे नव्हते झाले. आभाळ फाटलेलं असताना, जमिनीवर चाललेला पाण्याचा खेळ अनेक आयुष्य घेऊन निघून गेला. अशा वेळी अनेक ठिकाणाहून मदतकार्य केले जात होते. अनेकांना वस्तू, साहित्य, पिण्याच्या पाण्यापासून ते चिखल साफ करणाऱ्या कपड्यांपर्यंत मदत पोहोचवण्यात आली.

यामध्ये जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानातर्फे महाडला ५ फिरते दवाखाने सुद्धा कार्यरत आहेत. पूर ओसरल्यानंतर देखील साफसफाईचे काम मोठ्या प्रमाणात करण्याचे होते, त्यामध्ये सुद्धा जगद्गुरू धावून आले. त्यांनी आपल्या मुंबई, पुणे येथील भक्तांना साफसफाईच्या कामासाठी महाडवासियांना मदत करण्याचे आवाहन केल्यावर ५ हजार सेवेकरी ताबडतोब तिथे हजार झालेत. आणि सफाईच्या कामामध्ये मदतकार्य करायला सुरुवात केली.

फिरत्या दवाखान्यासाठी सुद्धा मुंबई, पुणे येथील डॉक्टर्स लगेच घटनास्थळी दाखल झाले असून, तपासणी आणि औषधे संस्थानातर्फे मोफत पुरवली जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान पसरले आहे. अशाच प्रकारच्या फिरत्या दवाखान्यांची योजना चिपळूणमध्येही राबविण्यात आली असल्याने रोगराई पसरण्यापासून आळा बसेल. जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानने अन्नधान्य, कपडेलत्ते, पाणी, गरजेच्या गोष्टी पूरग्रस्तांसाठी पुरविल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular