29.7 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

चिपळूणमध्ये जलकुंडानं साठवलं पाणी, शेती पिकणार सोन्यावाणी

कोकणाला मुसळधार पावसाचे वरदान मिळालेले असूनही उन्हाळ्यात...

मोकाट जनावरांच्या त्रासावर ‘अॅक्शन’ तहसीलदारांनी दिले तात्काळ कारवाईचे आदेश

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात मोकाट गुरांमुळे होणाऱ्या...

खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा अनेक कार्यकर्त्यांसह भाजप प्रवेश

रत्नागिरी जिल्ह्यातील खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर...
HomeIndiaहर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत पंतप्रधानांचे विशेष आवाहन

हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत पंतप्रधानांचे विशेष आवाहन

मी माझ्या सोशल मीडिया पेजेसवर डीपी बदलला आहे आणि तुम्हा सर्वांनीही असे फोटो ठेवा असं मी आवाहन करतो."

देशभरातील २० कोटींहून अधिक घरांवर केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत ऑगस्ट महिन्यात तीन दिवस तिरंगा फडकवला जाणार आहे. या कार्यक्रमांतर्गत २ ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये लोक सहभागातून घरांवर तिरंगा फडकवण्यात येणार असून सरकारी आणि खाजगी आस्थापनेचाही यामध्ये मोठा सहभाग असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील ‘प्रोफाइल’ फोटो बदलून डीपीवर तिरंगा लावला आहे. खरं तर, आकाशवाणीच्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ च्या ९१ व्या आवृत्तीत देशवासियांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा विशेष उल्लेख केला होता आणि लोकांना त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटचा ‘प्रोफाइल’ फोटो बदलण्यास सांगितले होते. २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक प्रोफाईलवर तिरंगा लावण्याचे आवाहन करण्यात आले होते. आज २ ऑगस्ट रोजी, पंतप्रधानांनी स्वत: तिरंगा त्यांचे ‘प्रोफाइल’ फोटो म्हणून ठेवले आहे.

यावेळी पंतप्रधानांनी एक ट्विट देखील केले आणि लिहिले की, “आज २ ऑगस्टचा दिवस खास आहे! अशा वेळी जेव्हा आपण आपला देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. आपला देश #HarGharTiranga साठी तयार झाला आहे. देशाचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी ही एक सामूहिक चळवळ आहे. मी माझ्या सोशल मीडिया पेजेसवर डीपी बदलला आहे आणि तुम्हा सर्वांनीही असे फोटो ठेवा असं मी आवाहन करतो.”

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील रविवारी केलेल्या पोस्टमध्ये २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तिरंग्याचा ‘प्रोफाइल’ पिक्चर म्हणून वापर करण्याचे आवाहन केले होते. यासोबतच त्यांनी लोकांना ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याचेही आवाहन केले होते.

RELATED ARTICLES

Most Popular