32 C
Ratnagiri
Saturday, April 20, 2024

रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी ९ उमेदवार रिंगणात

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या...

आरवलीतील गरम पाण्याचे कुंड दुर्लक्षित, महामार्ग चौपदरीकरणाचा अडथळा

चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदार संघात शेकडो कोटींची...

अडीच लाखांचे मताधिक्य घेऊ – नारायण राणे

महायुतीचा उमेदवार म्हणून भाजपने मला संघी दिली....
HomeEntertainmentचित्रपटाच्या प्रदर्शित होण्यापूर्वीच, बॉयकॉट लाल सिंग चढ्ढा असा कॅम्पेन सुरु

चित्रपटाच्या प्रदर्शित होण्यापूर्वीच, बॉयकॉट लाल सिंग चढ्ढा असा कॅम्पेन सुरु

लाल सिंग चढ्ढाचं प्रमोशन जोरदारपणे सुरु असताना आमीरनं या केलेल्या वक्तव्यावरुन त्याच्यावर टीकेची झोड उठत आहे.

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान तब्बल चार वर्षानंतर त्याच्या लाल सिंग चढ्ढा चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. मात्र नेहमीप्रमाणे या चित्रपटाला आधीच गालबोट लागल्याचे सोशल मीडियावरुन दिसून आले आहे. येत्या ११ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, त्यापूर्वीच बॉयकॉट लाल सिंग चढ्ढा असा कॅम्पेन सोशल मिडीयावर सुरु करण्यात आलं आहे. त्यामुळे आमीर खान देखील या चित्रपटाच्या चिंतेत आहे. यापूर्वी त्यानं आणि त्याच्या बायकोने भारताविरोधात केलेल्या वक्तव्याचा फटका लाल सिंग चढ्ढाला बसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आमीरनं त्यावर प्रतिक्रिया देत ट्रोर्लसला प्रश्न विचारले आहे.

२०१५ मध्ये आमीरनं एक वक्तव्य केले होते. आपला देश सहिष्णू आहे. मात्र काही लोकं अशी आहेत ज्यामुळे देशातील वातावरण दुषित होऊन निघाले आहे. त्यामुळे मी आणि माझी मुलं हा देश सोडण्याचा विचार करत आहोत. लाल सिंग चढ्ढाचं प्रमोशन जोरदारपणे सुरु असताना आमीरनं या केलेल्या वक्तव्यावरुन त्याच्यावर टीकेची झोड उठत आहे. मात्र आता ते विधान आणि लाल सिंग चढ्ढा यांचा काही संबंध नसताना ते जोडण्याचे काम नेटकरी करत आहे. त्यामुळे त्याला ट्रोल देखील केले जात आहे.

माध्यमांनी आमीरला सोशल मीडियावर बॉयकॉट लाल सिंग चढ्ढा यावर प्रश्न विचारला. तेव्हा तो म्हणाला, जेव्हा मला लोकं लाल सिंग चढ्ढा बॉयकॉट करण्याविषयी सांगतात तेव्हा प्रचंड वाईट वाटते. त्यांना असे की वाटते,  मी त्यांच्या ब्लॅक लिस्टमध्ये आहे. त्यामुळे त्याचा राग ते माझ्या चित्रपटांवर काढताना दिसतात. माझे वक्तव्य त्यामागील त्यावेळची परिस्थिती, त्याला असणारे संदर्भ ते लक्षात घ्यायला मागत नाही. त्यामुळे गैरसमज होतात. त्याचा फटका त्या कलाकृतीला बसतो. असे आमीरचे म्हणणे होते. ज्या लोकांना भारत आवडत नाही अशा लोकांच्या यादीत मला देखील नेटकऱ्यांनी समाविष्ट करुन घेतले आहे, जे पूर्णत: चुकीचे आहे आणि हे ऐकून मला खेद वाटतो.

RELATED ARTICLES

Most Popular