28.7 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

रशिया, जपानला त्सुनामीची धडक प्रशांत महासागरात ८.८ रिश्टर तीव्रतेचा भूकप

रशियाच्या अतिपूर्वेकडील भागाला आज सकाळी साडेआठ वाजता...

लांजा विकास आराखडा रद्द होणार नाही – आमदार किरण सामंत

लांजा विकास आराखडा प्रसिद्ध झाला तेव्हा समन्वयाची...

सीआरपी महिलांचे रत्नागिरीत धरणे आंदोलन

महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित लोकसंचालित साधनकेंद्रातील...
HomeMaharashtraनवाब मलिक यांना ३ मार्च पर्यंत ईडी कोठडी

नवाब मलिक यांना ३ मार्च पर्यंत ईडी कोठडी

अंडरवर्ल्डशी काहीतरी संबंध असण्याची शक्यता असल्याच्या करणावर ईडीने घरात काही छाननी केल्याची माहिती समोर आली आहे.

अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. काल सकाळी नवाब मलिक यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालयाने छापे टाकले. त्यानंतर मलिक यांना ईडीने ताब्यात घेतले असून त्यांची तब्बल ८ तास चौकशी करण्यात आली.

नवाब मलिक यांच्या घरी काल सकाळी साडे सहा वाजता ईडीचे अधिकारी येऊन थडकले. अंडरवर्ल्डशी काहीतरी संबंध असण्याची शक्यता असल्याच्या करणावर ईडीने घरात काही छाननी केल्याची माहिती समोर आली आहे. याआधी अंडरवर्ल्डशी संबंधित इक्बाल कासकर तसेच अन्य काही व्यक्तींची चौकशी देखील करण्यात आली होती. त्यांच्या खात्यात काही आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती ईडीकडे असल्याचं कारण देण्यात आले आहे. दाऊद इब्राहिमशी संबंधित काही व्यक्ती आणि खात्यांमधून मलिक यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे संबंध असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

दाऊद इब्राहिम मनी लॉड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. राज्यामध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा जोरदार वाद पेटला असतानाच ईडीच्या दिल्ली आणि मुंबईतील पथकांनी मागील आठवड्यात दक्षिण मुंबईत काही ठिकाणी छापे टाकले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ईब्राहीम याच्या मालमत्तांशी संबंधित प्रकरणात त्याचा जेलमध्ये असलेला भाऊ इक्बाल कासकर, मृत बहीण हसीना पारकर यांच्या घरांसह अन्य काही ठिकाणी ईडीच्या पथकांनी छापे मारले होते.

 दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार त्यांची ईडी चौकशी केली जात आहे. त्यानंतर संध्याकाळी मंत्री नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. नवाब मलिक यांची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. जवळपास अडीच तासापेक्षा अधिक वेळ दोन्ही बाजूने युक्तीवाद पार पडल्यानंतर कोर्टाने नवाब मलिक यांना ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फक्त मलिक यांना घरचं जेवण घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular