26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeMaharashtraसमीर वानखेडेना न्यायालयाने फटकारले, परंतु, पुढील सुनावणीपर्यंत दिलासा

समीर वानखेडेना न्यायालयाने फटकारले, परंतु, पुढील सुनावणीपर्यंत दिलासा

वानखेडे यांच्या याचिकेत अशी कोणती आवश्यक गोष्ट होती. आभाळा फाटणार होतं का?  या याचिकेवर तातडीने सुनावणी होणार नाही. नंतर सुनावणी घेतली जाईल.’ असे न्यायालयाने सांगितले.

आर्यन खान क्रुज ड्रग्स प्रकरणापासून, एनसीबीच्या मुंबई विभागाचे वादग्रस्त माजी संचालक समीर वानखेडे यांच्याबद्दल विविध प्रकरणे बाहेर येत आहेत. त्यामध्ये अनेक बनावट कागदपत्रांची प्रकरणे बाहेर आली आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या धर्माबद्दल सुद्धा अनेक पुरावे समोर आले आहेत.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबीच्या मुंबई विभागाचे वादग्रस्त माजी संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे आणि खोट्या माहितीच्या आधारे मद्यविक्री परवाना मिळविल्याप्रकरणी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात सरकारची फसवणूक केल्याचा गुन्हा शनिवारी दाखल झाला. राज्य उत्पादन शुल्कच्या नवी मुंबई विभागाने ही फिर्याद दाखल केली आहे.

मुंबईतील मद्यालयासाठीचा परवानासंदर्भात पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याबाबत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावर तातडीने सुनावणी घेण्यास हायकोर्टाने नकार दिला होता. मात्र समीर वानखेडेंना अटकेपासून हायकोर्टाने तूर्तास दिलासा मिळाला आहे. पुढील सुनावणी २८ फेब्रुवारी रोजी असून तोपर्यंत अटकेची कारवाई न करण्याचे ठाणे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने नवी मुंबईतील सद्गुरु हॉटेलसाठी वयाच्या सतराव्या वर्षी नावावर बार  परवाना घेतल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ते सज्ञान असल्याचे म्हटले होते. त्या जागेमध्ये कोणताही व्यवसाय केला नसल्यामुळे आयकर आणि विक्रीकर विवरणपत्र सादर केले नसल्याचेही म्हटले होते. ते सज्ञान असल्याबाबतची चुकीची माहिती दिली होती.

या प्रकरणाबाबत वानखेडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. तसेच गुन्हा रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. याबाबत सोमवारी उशिरा याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर लगेचच मंगळवारी या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावरूनच न्यायालय भडकल्याचे दिसले. न्यायालयाने अधिकाऱ्यांनाच कडक शब्दांत सुनावलं. न्यायमुर्ती जमादार म्हणाले, ‘एखादा गरीब व्यक्ती याचिका दाखल करतो आणि प्रकरण कधीच सुनावणीला येत नाही. पण एखादी प्रसिद्ध व्यक्ती याचिका दाखल करते तेव्हा, त्याची याचिका लगेचच सुनावणीला येते. वानखेडे यांच्या याचिकेत अशी कोणती आवश्यक गोष्ट होती. आभाळा फाटणार होतं का?  या याचिकेवर तातडीने सुनावणी होणार नाही. नंतर सुनावणी घेतली जाईल.’ असे न्यायालयाने सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular