26.1 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeMaharashtraसमीर वानखेडे यांना सोशल मिडीयावरून धमकीचे ट्वीट

समीर वानखेडे यांना सोशल मिडीयावरून धमकीचे ट्वीट

आरोपीने वानखडे यांना टॅग करून हा मेसेज केला होता. यावर वानखडे यांनी त्याला उत्तर देखील दिले आहे.

समीर वानखेडे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी समीर वानखेडे यांना धमकावण्याचे ट्विट आले आहे. समीर वानखेडे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात या धमकी बद्दल माहिती दिली असून धमकी आलेल्या माध्यमाचा त्या ट्विटबाबतही पोलिसांना माहिती दिली आहे.

वानखेडेंना सोशल मीडियांच्या माध्यमातून ही धमकी प्रकरणी त्यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. मेसेजमध्ये “तुमको पता नहीं तुमने क्या किया है, इसका हिसाब तुमको देना पड़ेगा. तुमको खत्म कर देंगे,” असे टि्वटरच्या मेसेजमध्ये लिहिलं आहे. ट्विटरवर वानखेडेंना धमकीचा मेसेज आला आहे. त्यानंतर वानखेडेंच्या या धमकीच्या ट्विटविषयीच्या पोलिस तपासात लक्षात आले आहे कि, ज्या व्यक्तीने टि्वट करुन वानखेडेंना धमकी दिली होती हे अकाऊन्ट त्याच दिवशी सुरू करण्यात आले होते. आरोपीने वानखडे यांना टॅग करून हा मेसेज केला होता. यावर वानखडे यांनी त्याला उत्तर देखील दिले आहे. त्यानंतर काही तासात आरोपीने ते टि्वट डिलिट केले आहे.

आर्यन खान ड्रग्ज अटक प्रकरणी वानखेडे यांचे नाव विशेष समोर आले होते. त्यानंतर मलिक यांनी वानखेडे आणि कुटुंबावर अनेक आरोप प्रत्यारोप केले होते. नवाब मलिक यांनी महाराष्ट्रात मंत्री असताना वानखेडे यांच्यावर एससी-एसटीची बनावट कागदपत्रे बनवून नोकरी मिळवल्याचा आरोप केला होता. महाराष्ट्र सामाजिक न्याय विभागाच्या मुंबई जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर वानखेडेंनी हा खटला दाखल केला. वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular