26.6 C
Ratnagiri
Tuesday, November 25, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeLifestyleवयोमानानुसार येणारा हाडांचा अशक्तपणा, आहार बदल आवश्यक

वयोमानानुसार येणारा हाडांचा अशक्तपणा, आहार बदल आवश्यक

हाडं कमजोर झाली असतील तर वैद्यकीय उपचार घेऊन उपयोग नाही. तर सोबत कॅल्शियमयुक्त आहाराची आवश्यकता असते.

शरीराची ठेवण मजबूत करण्यात पुरेसा आणि निरोगी आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. आजच्या आधुनिक जीवनशैलीत निष्क्रियता वाढलेली आहे. जसं जस वय वाढतं तशी हाडं कमजोर होत जातात. वय, जीवनशैली यांचा शरीरावर होणारा परिणाम थांबवू शकत नाही. हाडं कमजोर होण्यामुळे गुडघे, सांधे दुखतात याचबरोबर ऑस्टियोपोरोसिस समस्या ही होते. कधी कधी हाडं एवढी अशक्त होतात की, केवळ उभ्याने शिंकण्याचाही हाडांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

अयोग्य आहारविषयक सवयीचा देखील यामध्ये परिणाम झालेला दिसून येतो. आहारात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि ड जीवनसत्त्व, यांसारख्या महत्त्वाच्या घटकांची कमतरता ही सुद्धा हाडांच्या अशक्तपणाची काही कारणं आहेत. अधिक मद्यपान आणि तंबाखूचे सेवन याचे महत्त्वाचं कारण आहे.

ऑस्टियोपोरोसिसपासून बचाव करण्यासाठी कॅल्शियम, प्रथिनं आणि ड जीवनसत्वाचे आहारात समावेश अत्यावश्यक आहे. प्रथिनयुक्त खाद्यपदार्थ म्हणजे अगदी दररोजच्या जेवणातील धान्यं, डाळ, राजमा, चवळी, सुकामेवा ई. शरीराच्या पेशींना निरोगी ठेवण्यास सहाय्यक ठरतात. हाडांना आधार देण्यासाठी निरोगी पेशीचा जास्त उपयोग होतो. पण त्यासाठी लाल मांस आणि कॅफिन पासून दूर राहायला हवे.

बोन डेन्सिटी किती आहे हे जाणून घेण्यासाठी काही तपासणी करून घ्याव्या लागतात. ड जीवनसत्त्व तपासणीच्या माध्यमातून शरीरातील कॅल्शियमची पातळी समजू शकते. यामुळे एखाद्या व्यक्तीला किती कॅल्शियमची गरज आहे, हे देखील त्वरित समजते. कॅल्शियम डेन्सिटी टेस्टच्या तुलनेत हा चांगला पर्याय आहे.

हाडं कमजोर झाली असतील तर वैद्यकीय उपचार घेऊन उपयोग नाही. तर सोबत कॅल्शियमयुक्त आहाराची आवश्यकता असते.  कारण तेव्हाच गोळ्यांमधील कॅल्शियम शरीरात शोषले जाते यासाठी आहारामध्ये फळं, भाज्या, एक मूठभर बदाम, दुध यांचा समावेश करणे आवश्यक आहे. शिवाय आहारामध्ये फ्लॉवर, मासे, अंडी आणि पालेभाज्या कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहेत. जर हाडांच्या कमजोरीची फक्त समस्या असेल तर डॉक्टरी सल्ला घेऊन केवळ आहारात सकारात्मक बदल करूनही ही समस्या ठीक होऊ शकते.

RELATED ARTICLES

Most Popular