26.4 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeRatnagiriनेपाळी महिलेने रत्नागिरीमध्ये सुरू केलेल्या अनैतिक धंद्याचा पर्दाफाश

नेपाळी महिलेने रत्नागिरीमध्ये सुरू केलेल्या अनैतिक धंद्याचा पर्दाफाश

महिला पुण्यातील तरुणींना रत्नागिरीत आणून देहविक्रीच्या दलदलीत ढकलत होती.

रत्नागिरीसारख्या शांत आणि सुसंस्कृत शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नेपाळमधील एका महिलेने बाहेरून तरुणी आणून देहविक्रीचा सुरू केलेल्या अवैध व्यवसायाचा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे ही महिला पुण्यातील तरुणींना रत्नागिरीत आणून देहविक्रीच्या दलदलीत ढकलत होती. याप्रकरणी संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे. याविषयी पोलीसांकडून पत्रकारांना देण्यात आलेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रत्नागिरी येथील मिरजोळे एमआयडीसीतील एका प्लॉटवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत एका नेपाळी महिलेला अटक करण्यात आली. तपासादरम्यान तिने पुण्यातून दोन महिलांना रत्नागिरीत आणल्याचे व त्यांच्याकडून देहविक्री करून घेत असल्याचे समोर आले.

गुन्हा दाखल – या प्रकरणी अनैतिक व्यापार १९५६ (प्रतिबंध) अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छाप्यातून दोन तरूणींची सुटका करण्यात आली असून त्यांना देहविक्रीच्या व्यवसायातून मुक्त केले आहे. याबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नेपाळी महिलेला अटक करून तिची रवानगी दोन दिवसांसाठी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईत अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

पुढील तपास सुरू – या प्रकरणामागे आणखी मोठे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, त्याबाबत सखोल तपास सुरू आहे. परराज्यातील तरुणींना आमिष दाखवून देहविक्रीच्या व्यवसायात ओढण्याचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

RELATED ARTICLES

Most Popular