लायन्स इंटरनॅशनल संस्था कार्यकारणीचा कार्यकाल फक्त एक वर्षाचा असतो. त्यानुसार, वर्ष २०२१-२२ करिता वर्षाकरिता लायन्स क्लब रत्नागिरीच्या नूतन कार्यकारणीचा शपथ ग्रहण समारंभ लायन्सआय हॉस्पिटलच्या सभागृहात सर्व शासकीय परवानगीसह २५ सभासदांच्या उपस्थित मध्ये सर्व कोरोना निर्बंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करून संपन्न झाला.
लायन्स इंटरनॅशनल संस्था हि जगभरामध्ये २१० देशांमध्ये कार्यरत असलेली १०४ वर्षाची अग्रगणी संस्था आहे. या संस्थेची मागील वर्षीची कार्यकारिणी, ज्यांनी लायन्सच्या कारकीर्दीमध्ये चार चांद लावले, त्या माजी अध्यक्षा लायन श्रेया केळकर, सचिव मनाली राणे, खजिनदार डॉ. शिवानी पानवलकर ह्यांनी आपल्या वैभवशाली कार्यकालाचा आढावा घेऊन क्लब मधील अनेक सभासदांचा मानचिन्ह देऊन सन्मान केला. त्याचप्रसंगी रत्नागिरी लायन्स इंटरनॅशनल संस्थेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, रत्नागिरीतील प्रतिथयश ऍडव्होकेट लायन शबाना वस्ता ह्यांची अध्यक्षपदासाठी निवड झाली असून, त्यांनी शपथ ग्रहण केली तर सचिवपदी म्हणून लायन अभिजित गोडबोले आणि खजिनदार पदी प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक, रत्नागिरीतील अनेक हॉटेल्सचे सर्वेसर्वा लायन गणेश धुरी ह्यांनी शपथ घेतली.
या कार्यक्रमासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या आधारे प्रमुख पाहुणे मल्टिपल कौन्सिल चेअरमन लायन गिरीश मालपाणी हे उपस्थित होते, ह्यांनी सर्व उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले, तसेच सदर नूतन कार्यकारिणीच्या शपथविधी कार्यक्रमासाठी लायन्स क्लब मालवण येथील माजी रिजन चेअरमन लायन गणेश प्रभुलकर ह्यांच्या हस्ते नूतन कार्यकारणीला शपथ देण्यात आली.
ह्या कार्यकारणी मध्ये सल्लागार म्हणून जेष्ठ लायन डॉ. रमेश जी चव्हाण, लायन सुधीर उर्फ आप्पा वणजु, लायन दीपक साळवी, ला प्रमोद खेडेकर, लायन डॉ संतोष बेडेकर, लायन यश राणे, लायन डॉ. शैलेंद्र भोळे, लायन डॉ. ओंकार फडके, लायन सुप्रिया बेडेकर, लायन क्षिप्रा कोवळे काम पहाणार आहेत. सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथग्रहण सोहळा संपन्न झाल्यावर माजी अध्यक्षा लायन श्रेया केळकर ह्यांनी सर्व सूत्रे नूतन अध्यक्षा लायन ऍड. शबाना वस्ता ह्यांच्याकडे सुपूर्द केली. अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच नूतन अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष ह्यांनी आपली मनोगते व्यक्त करून लायन्स क्लब रत्नागिरीला विविध समाजकार्य करून उतुंग शिखरावर नेण्याचा विश्वास व्यक्त केला.